मेनका गांधी (Photo Credits-Twitter)

तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे गेल्याच आठवड्यात चार नराधामांनी तिच्यावर बलात्कार करुन जिवंत जाळल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी आरोपींना पोलिसांनी अवघ्या काही तासाताच अटक केली. मात्र आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी देशाच्या कानाकोपऱ्यातून करण्यात आली. तर आज अखेर या चारही आरोपींचा एन्काउंटर करण्यात आला. या प्रकरानंतर राज्यातील विविध ठिकाणाहून समाधान व्यक्त केले जात आहे. तसेच पीडित महिला डॉक्टरांच्या नातेवाईकांनी सुद्धा याबाबत आपल्या प्रतिक्रिया देत असे म्हटले आहे की, आता मुलीच्या आत्माला शांती मिळेल.

याच हैदराबाद घटनेचा संताप सर्वत्र पसरत चाललेला पाहून अखेर त्यांना योग्य ती शिक्षा झाली आहे. यावर भाजप खासदार मेनका गांधी यांनी  आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी प्रसामाध्यमांना  दिलेल्या माहितीत  असे म्हटले आहे की, जे काही झाले आहे ते या देशासाठी अत्यंत भयंकर आहे. मात्र तुम्ही लोकांची तुमच्या स्वार्थासाठी हत्या करु शकत नाही. तसेच तुम्ही कायदा सुद्धा हातात घेऊ शकत नाही. पण या सर्व प्रकारावर न्यायालयाने त्यांना फाशी देणे अनिवार्य होते.(महिलांच्या सुरक्षिततेसाठी नागपूर, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि मुझफ्फरनगर पोलिसांनी सुरू केली Home Drop सेवा)

ANI Tweet:

पशु चिकित्सक पीडित महिला डॉक्टर बुधवारी कोल्लरु येथील पशु चिकित्सालयात गेली होती. तेथे जवळच असलेल्या शादनगर टोल नाक्यावर तिने स्कुटी पार्क केली. रात्री जेव्हा महिला तेथे आली त्यावेळी स्कुटी पंक्चर झाली होती. यावर तिने प्रथम बहिणीला फोन लावला आणि याची माहिती दिली. यावेळी तिने बहिणीला मला भीती वाटत असल्याचे ही म्हटले होते. यावर बहिणीने तिला टॅक्सीने घरी येण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तिने काही लोकांकडे मदत मागितली. त्यानंतर तिचा मोबाईल बंद झाला. पीडित महिलेच्या नातेवाईकांनी तिचा टोल प्लाझा येथे शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र तिचा तपास लागला नाही. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी पीडित महिलेचा जळालेला मृतदेह भुयारी मार्गाचा येथे आढळून आला होता.