आज केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) विधानसभा निवडणूक तारीख जाहीर केली आहे. हिमाचल प्रदेश मधील विधानसभा निवडणूका एका टप्प्यात 12 नोव्हेंबरला पार पडतील. तर 8 डिसेंबर दिवशी मतमोजणी होणार असून तेव्हाच निकाल जाहीर केला जाणार आहे. यासाठी आचारसंहिता आजपासून लागू होणार आहे. हिमाचल प्रदेशच्या विधानसभेचा कालावधी 8 जानेवारीला संपणार आहे. या निवडणूकांकरिता केंद्रीय निवडणूक आयोगाने तयारीचा आढावा घेतला आहे.
हिमाचल प्रदेशामध्ये 55 लाख मतदार आहेत. पत्रकार परिषदेत आज दिलेल्या माहितीमध्ये 1184 मतदार शंभरी पार आहेत. दरम्यान या निवडणूकीची अधिसूचना 17 ऑक्टोबरला जारी केली जाणार आहे. 80 वर्षांवरील वृद्ध व्यक्ती, दिव्यांगांच्या घरी जाऊन मतदान करण्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देणार आहेत. हे देखील नक्की वाचा: Election Commission: गुजरातसह हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार, भारत निवडणूक आयोगाची महत्वाची पत्रकार परिषद .
Himachal Pradesh Assembly Elections 2022: Polling on November 12, counting of votes on December 8
Read @ANI Story | https://t.co/TapSfkZSLC#HimachalPradesh #elections2022 #assemblyelections #HimachalPradeshelections2022 pic.twitter.com/khceyaVPCi
— ANI Digital (@ani_digital) October 14, 2022
हिमाचल प्रदेश मध्ये 68 जागा असून 35 हा बहुमताचा आकडा आहे. 2017 मध्ये झालेल्या निवडणूकांच्या वेळेस भाजपाने हिमाचल प्रदेशात 44 तर कॉंग्रेस 21 जागी विजय मिळवला होता. आजच्या निवडणूकीमध्ये गुजरात विधानसभा निवडणूकीबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. गुजरात विधानसभेचा कालावधी फेब्रुवारी 2023 पर्यंत असल्याने वर्षअखेरीस त्याची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.