Lok Sabha Elections 2019: आप पार्टीच्या उमेदवार आतिषी यांनी केलेले आरोप सिद्ध झाल्यास उमेदवारी घेणार मागे- गौतम गंभीर
Gautam Gambhir (Photo Credits-ANI)

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्ली मतदारसंघाचे उमेदवार गौतम गंभीर(Gautam Gambhir) याने आपच्या उमेदवार आतिशी(Aatishi) यांना पत्रकार परिषदेत आपल्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाला उत्तर देत 'जर आपल्यावरचे आरोप खरे झाले, तर राजकारण सोडेल' असा इशारा दिला आहे. 'राजकारणात आल्याबद्दल मी गंभीरचं स्वागत केलं होतं, पण आता भाजप खालच्या स्तरावर गेली आहे,' असा आरोप आतिशी यांनी केला होता.

गंभीरने आपल्यावर केलेले हे गंभीर आरोप फेटाळले असून, 'जर त्यांच्याकडे पुरावा असेल, तर मी तत्काळ राजकारणातून निवृत्त होईन. त्यांनी 23 मेपर्यंत पुरावा दिला, तरी मी राजकारण सोडून देईन. पण जर अरविंद केजरीवाल यांनी पुरावे दिले नाहीत, तर 23 मेनंतर ते राजकारण सोडतील का?' असा सवाल गंभीरने उपस्थित केला.

तसेच मलाही 2 मुली आहेत. मी महिलांचा मान राखतो. त्यामुळे एवढ्या खालच्या पातळीला कोणी कसं जाऊ शकतं? तसेच माझ्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास त्या राजकारणातून माघार घेणार का? असा प्रतिसवाल गौतम गंभीरने केला आहे.  त्यामुळे आता ह्या प्रश्नावर आपच्या नेत्याकडून काय उत्तर येतयं हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल.

दिल्ली: मोतीनगर येथील रोड शो दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या श्रीमुखात भडकवली 

गौतम गंभीर याने प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकात आतिषी आणि त्याच्या कुटूंबाविषयी आक्षेपार्ह वक्त्यव केले होते. त्यावर नाराजी व्यक्त करत गौतम गंभीर यांची महिलांसाठीची मानसिकता इतकी खालच्या पातळीची असेल असं वाटलं नव्हतं असं आतिशी यांनी म्हटले. जर अशा मानसिकतेच्या लोकांना मतं मिळाली आणि ते निवडून आले तर ते महिलांच्या सुरक्षेबाबत किती सजग रहातील? असाही प्रश्न आतिशी यांनी विचारला होता.