महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा महाविकास आघाडी सरकार विरूद्ध भाजपा (MVA On BJP) अशा संघर्ष सुरू झाला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याने भाजपा नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेडणेकर यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आज आशिष शेलार यांनी जामीनासाठी अर्ज केला. त्यानंतर शेलार यांना 1 लाखाचा ऑनटेबल जामीन मंजूर केला आहे. इतकंच नाही तर शेलार यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेत महापौरांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे. शेलार यांच्या झालेल्या तक्रारारीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर मध्ये पत्रकांराशी संवाद साधला. भाजपाचा कुठलाही नेता विशेषत: आशिष शेलार हे कोणत्याही महिलेबद्दल अभद्र किंवा चुकीचा शब्द वापरू शकत नाहीत. महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविषयी तर कधीच नाही. अतिशय चुकीचा अर्थ काढून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे तसेच, फडणवीस यांनी या प्रकरणी शिवसेनेवर टीका करत गंभीर आरोपही केले आहे.
भाजपाचा कुठलाही नेता कोणत्याही महिलेबद्दल अपशब्द वापरूच शकत नाही. महापौरांबद्दल आम्हाला पूर्ण आदर आहे.
आशीष शेलार @ShelarAshish शिवसेनेविरुद्ध आक्रमक बोलतात, त्यामुळे त्यांना शांत करण्यासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आला का, हा प्रश्न आहेच.
नागपूर येथे माध्यमांशी संवाद... pic.twitter.com/60F9oN6wpA
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 9, 2021
आशिष शेलार हे कोणत्याही महिलेबद्दल अभद्र किंवा चुकीचा शब्द वापरू शकत नाहीत. महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविषयी अजिबात नाही. काल झालेल्या पत्रकार परिषद किंवा प्रेस नोटमध्ये याचा अतिशय चुकीचा अर्थ काढून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आशिष शेलार शिवसेनेविरुद्ध आक्रमक बोलतात. त्यांना शांत करण्यासाठी अशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलाय का? अशी शंकासुद्धा उपस्थित केली जात आहे. तसेच महापौर असुद्या कि कोणत्याही महिला मी असे खात्रीने सांगु शकतो की भाजप किंवा अशिष शेलार हे कोणतेही वाईट शब्द किंवा चुकीचे बोलु शकत नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. (हे ही वाचा Jitendra Awhad On Sanjay Raut & Sharad Pawar Viral Photo: संजय राऊतांना जितेंद्र आव्हाडांकडून नमन, पवारांना खूर्ची नेऊन दिल्याने राऊतांवर टीका करणाऱ्यांवर आव्हाड संतापले.)
फडणवीस पुढे म्हणतात, काँग्रेस ने नागपुरात उमेदवार बदलला काय किंवा तोच ठेवला काय, ही निवडणूक चंद्रशेखर बावनकुळे मोठ्या फरकाने जिंकणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा संजय राऊत यांना टोला
काही बाबतीत राजकारणापासून दूर राहीलं पाहिजे. विशेषतः सेनाप्रमुख साडीएस (CDS) यांचा विषय आहे. तिथे असे लुज वक्तव्य करण्यापेक्षा देशाची सर्वोच्च प्राथमिकता हा अपघात का झाला ही आहे. तिन्ही सेना मिळून याची चौकशी करत आहेत. चौकशी होईपर्यंत याबाबत बोलणे अनुचित आहे, असा टोला फडणवीस यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊतांनवर केला आहे.