Exit Poll Results of Bihar Assembly Elections 2020: बिहार निवडणूक निकालात  CNN News18-Today's Chanakya च्या अंदाजानुसार महागठबंधन 180 तर NDA 55 जागा जिंकणार 
Bihar Assembly Elections 2020 | (Photo Credits: File Image)

बिहार विधानसभा निवडणूकीचे (Bihar Elections)  मतदान संपल्यानंतर आता एक्झिट पोल स्पष्ट होत आहेत. अनेक संस्था त्यांचे एक्झिट पोल, ओपिनियन पोलमध्ये यूपीए-एनडीए मध्ये कांटे की टक्कर होत असतानाचं चित्र असताना CNN News18-Today's Chanakya च्या अंदाजानुसार महागठबंधन 180 तर NDA 55 जागा जिंकणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे सध्या महागठनबंधन म्हणजे आरजेडीच्या तेजस्वी यादव, कॉंग्रेसच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. मात्र भाजपानं 10 नोव्हेंबर पर्यंत वाट पाहण्याचा, सबुरीचा मार्ग निवडला आहे. दरम्यान कोरोना संकटकाळात अनेक आव्हानांचा सामना करत पार पडलेल्या बिहार निवडणूकीचा निकाल आता 10 नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे. मात्र त्यापूर्वी एक्झिट पोल जाहीर करत मतदारांचा नेमका कल  कुठे होता याचा अंदाज लावला जात आहे.  Exit Poll Results of Bihar Assembly Elections 2020: बिहार निवडणूक निकालामध्ये Times Now-C-Voter च्या अंदाजानुसार महागठबंधन च्या पारड्यात 120 तर NDA कडे 116 जागा . 

बिहारमध्ये 243 जागांवर विधानसभा निवडणूका पार पडल्या.त्यामुळे सत्तास्थापनेसाठी 122 जागांची आवश्यकता आहे. अशामध्येच सीएनएन आणि इंडिया टुडेच्या अंदाजानुसार महागठबंधनकडे त्यासाठी स्पष्ट बहुमत असेल. भाजपाच्या नेतृत्त्वाखालील असणार्‍या एनडीएला मात्र यंदा अवघ्या 55 जागांवर समाधान मानावं लागणार आहे. 

News18-Today's Chanakya च्या अंदाजानुसार कसा आहे एक्झिट पोलचा अंदाज? 

भाजपा – जेडीयू +   55 ± 11 जागा 

आरजेडी –कॉंग्रेस+ 180 ± 11 जागा 

इतर  8 ± 4 जागा 

बिहारची विधानसभा निवडणूक 243 जागांवर झाली आहे. तीन टप्प्यामध्ये यात मतदान झाले असून पहिल्या टप्प्यात म्हणजेच 28 ऑक्टोबरला 71, 3 नोव्हेंबरला दुसर्‍या टप्प्यात 94 तर आज तिसर्‍या टप्प्यात 78 जागांवर मतदान पार पडले आता याचा अंतिम निकाल 10 नोव्हेंबर दिवशी जाहीर केला जाणार आहे.