'तुम्ही सुट्टीवर असताना महाराष्ट्रात महाविकास आघाडीने पेट्रोल, डिझेलच्या दरात 1 रूपयांनी वाढ केली, हे विसरलात का?' राहुल गांधी यांच्या टीकेला भाजपकडून चोख प्रत्युत्तर
Rahul Gandhi | (PTI)

मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) सध्या राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. राज्यात मंगळवारपासून सुरू झालेली राजकीय उलथापालथ आज देखील पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला होता. जेव्हा मध्यप्रदेशात तुम्ही काँग्रेसचे निवडून आलेले सरकार अस्थिर करण्यामध्ये व्यस्त होता, तेव्हा जागतिक स्तरावर कच्चा तेलाच्या किमतीत 35 टक्के घसरण झाली. याकडे तुम्ही दुर्लक्ष केले, असे राहुल गांधी म्हणाले होते. राहुल गांधीच्या वक्तव्यावर भाजपने (BJP) प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही सुट्टीवर असताना महाराष्ट्रात महाविकास आघाडीने पेट्रोल, डिझेलच्या दरात 1 रूपयांनी वाढ केली, हे विसरलात का?' असा टोला भाजपने लगावला आहे.

ज्योतिरादित्य सिंधीया यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्वांनाच राहुल गांधी यांच्या प्रतिक्रियेची उत्सुकता लागलेली आहे. या पार्श्वभूमीवर आता तब्बल 24 तासानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशमधील राजकीय घडमोडींच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे मोदी सरकारवर निशाणा साधला होता. पंतप्रधान मोदींना उद्देशुन राहुल गांधी म्हणाले की, जेव्हा तुम्ही काँग्रेसचे निवडून आलेले सरकार अस्थिर करण्यामध्ये व्यस्त होता, तेव्हा जागतिक स्तरावर कच्चा तेलाच्या दरातील 35 टक्के घसरणीकडे तुमचे लक्ष गेले नाही. कृपया तुम्ही पेट्रोलचे दर 60 रुपये प्रति लिटरपर्यंत कमी करून देशातील नागिरकांना याचा लाभ देऊ शकता का? यामुळे देशाच्या रखडलेल्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, असे ट्वीट राहुल गांधी यांनी केले होते. हे देखील वाचा- Madhya Pradesh: सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे प्रयत्न; पक्षात असलेल्या 92 कॉंग्रेस आमदारांची जयपुरला रवानगी

भाजपचे ट्वीट-

राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर भाजपकडून चोख प्रत्युत्तर मिळाले आहे. राहुल गांधीजी तुमचे भारतात स्वागत आहे. तुमची सुट्टी चांगली गेली असावी, अशी आशा करतो. परंतु, ज्यावेळी तुम्ही सुट्टीवर होतात. तेव्हा तुमच्या महाविकास आघाडीच्या सरकारने महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 1 रुपयांनी वाढ केली आहे. हे तुम्ही विसरलात का? असे भाजपने ट्वीट केले आहे. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले आहे. नुकतेच पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ केल्याचे सांगितले होते.

v class="image_highlights_blk" >
'तुम्ही सुट्टीवर असताना महाराष्ट्रात महाविकास आघाडीने पेट्रोल, डिझेलच्या दरात 1 रूपयांनी वाढ केली, हे विसरलात का?' राहुल गांधी यांच्या टीकेला भाजपकडून चोख प्रत्युत्तर
Rahul Gandhi | (PTI)