Delhhi Election | X

दिल्ली मध्ये आज 70 विधानसभा जागांसाठी (Delhi Vidhan Sabha Election) मतदान सुरू झालं आहे. आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे मतदान सुरू राहणार आहे. दरम्यान दिल्ली मध्ये 1,56,14, 000 मतदार आहेत. त्यामध्ये 83,76173 पुरूष तर 7236560 महिला आहेत. 1267 ट्रान्स जेंडर आहेत. आज दिल्लीत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

मतदार AI-based Queue Management System app वापरू शकतात. "Delhi Election - 2025 QMS" हे गूगल प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे. यामध्ये रिअल टाईम गर्दी ट्रॅक करता येऊ शकते. सोबतच कलर कोडेड पोलिंग स्टेशन आहेत. हेल्पलाईन नंबर 1950 आहे.

मागील दोन टर्म दिल्ली मध्ये आम आदमी पार्टी ची सत्ता आहे. आप ला दिल्लीत मतदारांनी एकतर्फी विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे आता तिसर्‍यांदा आप सत्तेमध्ये येण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तर भाजपा आप वर मात करत सरकार स्थापनेसाठी पूर्ण प्रयत्न करताना दिसत आहे. Delhi Elections 2025: निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध FIR दाखल, यमुनेचे पाणी 'विषारी' बोलून फसले .

एनसीपी 30 जागांवर लढणार आहे तर शिवसेना पक्षाचा भाजपाला पाठिंबा राहणार आहे. एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका यापूर्वीच जाहीर केली आहे.