Pakistan Political Crisis: पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांच्या सत्तेवर संकटाचे ढग, मित्रपक्षांची विरोधकांशी हातमिळवणी
Pakistan PM Imran Khan (Photo Credit - FB)

पाकिस्तानातील पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) सरकारवर संकटाचे ढग दाटून आले आहेत. विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावामुळे पंतप्रधान इम्रान खान यांची खुर्ची धोक्यात असल्याचे दिसुन येते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इम्रान खानच्या मित्रपक्षांनी आता विरोधकांशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला आहे. इम्रान खानच्या मित्रपक्षांनी बाजू बदलली तर इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (Pakistan Tehreek-e-Insaf) सत्तेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. पाकिस्तानमध्ये एकूण 342 जागा आहेत. पाकिस्तानमध्ये बहुमत मिळवण्यासाठी 172 जागांची गरज आहे. इम्रान खान यांच्याकडे सध्या 179 जागा आहेत. इम्रान खानचे 15 सहकारी त्यांची बाजू सोडू शकतात अशी बातमी आहे. अशा परिस्थितीत विरोधकांनी इम्रानची बाजू सोडल्यास पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा सत्तापरिवर्तन होणे निश्चित आहे.

खासदारांनी विरोधकांशी केली हातमिळवणी

पाकिस्तानमध्ये राजकीय गोंधळ वाढत आहे. खरे तर क्रिकेटपटूतून राजकारणी झालेले पंतप्रधान इम्रान खान यांच्या सत्तेवर संकटाचे ढग दिसत आहेत. पाकिस्तानी संसदेत गेल्या आठवड्यात सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर लवकरच मतदान होणार आहे. पंतप्रधान इम्रान खान यांना सत्तेवरून हटवण्यासाठी त्यांच्याच राजकीय पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफच्या अनेक खासदारांनी विरोधकांशी हातमिळवणी केली आहे.

खासदारांची इम्रान खान यांच्याविरोधात नाराजी

अविश्वास प्रस्तावापूर्वीच अनेक पीटीआय खासदारांनी इम्रान खान यांच्याविरोधात नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी इम्रान खान यांच्या पक्षाच्या अनेक खासदारांनी पंतप्रधान म्हणून त्यांच्या नावाचा पाठिंबा काढून घेतला. पीटीआयचे खासदार निघून गेल्याचे वृत्त आल्यानंतर इम्रान खान यांनी पीटीआयच्या खासदारांनी विरोधी पक्षात बसण्यास तयार राहावे, असे म्हटले आहे. (हे देखील वाचा: International Beggar: पाकिस्तानचे पंतप्रधान Imran Khan बनले आहेत 'आंतरराष्ट्रीय भिकारी'; त्यांची उचलबांगडी झाल्यानंतर संपणार सर्व समस्या- Siraj-ul-Haq)

असे असणार सत्तेचे गणित

इम्रान खान सरकारमध्ये सहभागी असलेल्या मित्रपक्षाचे प्रमुख परवेझ इलाही म्हणाले की, पाकिस्तानच्या राजकारणात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ती पाहिल्यानंतर इम्रान खान यांची खुर्ची 100 टक्के जाणार हे निश्चित आहे. पाकिस्तानी संसदेच्या कनिष्ठ सभागृहात इम्रान खानच्या 4 मित्रपक्षांकडे एकूण 20 जागा आहेत. यापैकी 15 मित्रपक्षांनी आता विरोधकांशी हातमिळवणी केल्याचे मानले जात आहे. तसे झाले तर इम्रान खान यांना 179 पैकी 15 मित्रपक्ष असतील आणि पाकिस्तानमध्ये बहुमतासाठी 172 च्या जादुई आकड्याला स्पर्श करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर विरोधकांकडे 162 जागा आहेत. अशा परिस्थितीत हे सर्व 15 मित्रपक्ष विरोधकांसोबत गेल्यास इम्रान खान यांची खुर्ची पडणार हे नक्की.