Maharashtra Political News: 'बाळासाहेबाचं ते स्वप्न अपुरं'.......... केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केला खुलासा
Nitin gadkari and balasaheb thakare (Photo credit- FB)

Maharashtra Political News: जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्र राजकीय भुकंपाने हादरला. अजित पवारांनी (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यात सोबत  9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी बंडखोरी केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thakare) आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे (Udhdhav Thakare) शिवसेना यांनी एकत्र यावे अशी चर्चेला उधाण लागले आहे. यासंदर्भात अनेक ठिकाणी उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे अश्या मागणीचे बॅनर्स देखील लागले होते.

याचपार्श्वभुमीवर भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बाळासाहेबांची इच्छा अधुरी राहील्याचे माध्यामांसमोर सांगितले आहे. झी मराठी वरील खुपते तिथे  गुप्ते कार्यक्रमात नितीन गडकरींनी बाळासाहेबांबद्दल खुलासा केला आहे. या कार्यक्रमातील प्रोमो सध्दा सोशल मीडियाव व्हायरल होत आहे.  नितीन गडकरींनी खुलासा केला की, बाळासाहेबांवर माझ्यावर  आणि माझे बाळासाहेबांवर खुप प्रेम आहे. बाळासाहेबांच्या अखेरच्या दिवसांत जेव्हा मी त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा, मला एकट्यात त्यांनी त्यांची इच्छा सांगितली. राज आणि उध्दव यांना एकत्र करण्यास सांगितले. राजकारण बाजूला पण कुटूंब म्हणून एकत्र आल्यावर ताकद वाढेल. अश्या भावनिक शब्दांत त्यांनी सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

बाळासाहेबांचे स्वप्न अजूनही अपुरे राहील्याचे खुलासा नितीन गडकरी यांनी केली. शिंदे भाजप राज्यसरकारला एक वर्ष पुर्ण होताच, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्याची राजकीय परिस्थिती पाहता नितीन गडकरी यांनी भाष्य केले आहे.