राहुल गांधी आणि बाळासाहेब थोरात (Photo Credits-File/Twitter)

Budget 2020 Reaction: मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अखेर अर्थसंकल्प 2020-21 सादर केले आहे. हे अर्थसंकल्प सादर केल्यानंतर राजकीय नेत्यांपासून ते सामान्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर मोदी सरकारचे धोरण 'सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास' या मार्गाने यापुढे ही काम करणार आहे. बजेट सादर करताना निर्मला सीतारमण यांनी सर्वात प्रथम लोकसभा निवडणूक 2019 च्या मुद्द्यावर आपले मत व्यक्त कले. तसेच लोकसभा निवडणूकीत मोदी सरकारला बहुमत मिळाले होते. देशाच्या जनतेचा मोदी सरकारवर भरोसा असल्याचा त्यांनी विश्वास व्यक्त केला. पण आता अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर राजकीय वर्तुळात याबाबत चर्चा सुरु झाली असून विरोधकांकडून यंदाच्या बजेटवर टीका करण्यात आली आहे. या बजेटवर काँग्रेस नेते राहुल गांधी, बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बजेट सादर झाल्यानंतर बोलताना असे म्हटले आहे की, निर्मला सीतारमण यांनी अडीच तासांच्या वर त्यांनी संसदेत भाषण केल आहे. हे बजेट निराशाजनक असून त्यांनी अर्थसंकल्पात कुठलीच ठोस तरतूद केलेली नाही. मोदी सरकारचा अर्थसंकल्प गुंतागुंतीचा आहे. तसेच मोदी सरकारने कररचनेला अधिक क्लिष्ट केले असल्याची खंत व्यक्त केली आहे.(Union Budget 2020 Highlights: अर्थमंत्री निर्मला सीतारमण कडून अर्थसंकल्प जाहीर; जाणून घ्या अशा गोष्टी ज्यांचा तुमच्यावर होणार परिणाम)

Tweet:

बाळासाहेब थोरात यांनी असे म्हटले आहे की, आज जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र कोठे आहे? सर्वाधिक कर देणाऱ्या मुंबई आणि महाराष्ट्राची घोर निराशा मोदी सरकारने केली आहे. मोदी सरकारला महाराष्ट्राचे वावडे आहे का? तसेच जुन्याच योजना, मोठ्या घोषणा आणि आकडे यांनी भरलेला हा अर्थसंकल्प आहे. निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हेडलाईन मॅनेजमेंट करणारा आहे, सर्वसामान्यांना यातून काहीच मिळणार नाही.

Tweet:

संजय निरुपम यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, मोदी सरकारच्या या बजेटची कोणतीही खासियत नाही आहे. तेच जुने कार्यक्रम, जुनी धोरण यांची पुन्हा घोषणा केली आहे.

Tweet:

Randeep Singh Surjewala Tweet:

 

बजेट सादर करताना निर्मला सीतारमण यांनी सर्वात प्रथम लोकसभा निवडणूक 2019 च्या मुद्द्यावर आपले मत व्यक्त कले. तसेच लोकसभा निवडणूकीत मोदी सरकारला बहुमत मिळाले होते. देशाच्या जनतेचा मोदी सरकारवर भरोसा असल्याचा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे. हे बजेट देशाच्या महत्वकांक्षा पूर्ण करणारे बजेट ठरणार आहे.