Budget 2019: राहुल गांधी यांचं नरेंद्र मोदीवर टीकास्त्र, 5 वर्ष शेतकर्‍यांचं आयुष्य उद्धवस्त केलं, प्रतिदिन 17 रूपये देणे हा शेतकर्‍यांचा अपमान
Rahul Gandhi and Narendra Modi (Photo Credit: FB/PTI)

Budget 2019: मागील काही दिवसांपासून सुरू असलेला नमो विरूद्ध रागा हा वाद आजही कायम आहे. हंगामी अर्थमंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी आज संसदेमध्ये अंतरिम बजेट (Interim Budget 2019) मांडलं आहे. आगामी लोकसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्याने यंदा पूर्ण बजेटऐवजी हंगामी अर्थसंकल्प मांडण्यात आला. यामध्ये अपेक्षेप्रमाणे लोकप्रिय घोषणांचा वर्षाव झाला. मोदी सरकारने शेतकर्‍यांना जाहीर केलेल्या योजनेवरून कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi)  यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

मोदी सरकारने शेतकर्‍यांना प्रतिदिन 17 रूपये देऊन शेतकर्‍यांचा अपमान केला आहे असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. आज पियुष गोयल यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये शेतकर्‍यांना दरवर्षी सहा हजार रूपये देण्याची घोषणा केली आहे. या घोषणेवर टीका करण्यात आली आहे. मोदी सरकार अकार्यक्षम आणि उद्धट आहे. त्यांनी शेतकर्‍यांचे आयुष्य उद्धवस्त केले आहे असे म्हटले आहे. Budget 2019 : पंतप्रधान मोदींकडून स्वागत, राहुल गांधी यांनी केली टीका; अर्थसंकल्पावर कोण काय म्हणाले?

मोदी सरकारची घोषणा काय?

दुष्काळग्रस्त, अल्पभूधारक शेतकर्‍यांना दरवर्षी सहा हजार रूपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असणार्‍या शेताजमीन मालकांना मोदी सरकारच्या घोषणेचा फायदा होणार आहे. देशभरातील शेतकर्‍यांसाठी सरकारने या अर्थसंकल्पामध्ये सुमारे 75,000 हजार कोटी रूपयांची तरतूद केली आहे.