Lok Sabha Election 2019: काँग्रेससोबत आघाडी नाही, बहुजन समाज पक्ष सर्वेसर्वा मायवतींची घोषणा
BSP Chief Mayawati | (Photo Credits-ANI)

Lok Sabha Election 2019: बहुजन समाज पक्ष (Bahujan Samaj Party) हा देशभरातील कोणत्याही राज्यात राष्ट्रीय काँग्रेससोबत आघाडी करणार नाही, अशी घोषणा बसप सर्वेसर्वा मयावती (BSP Chief Mayawati) यांनी केली आहे. देशातील काही राज्यांमध्ये बसप आणि काँग्रेस (Congress Party) यांच्यात आघाडी होईल अशी चर्चा होती. परंतू, मायावती यांच्या या घोषणनेनंतर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मी पुन्हा एकदा स्पष्ट करते की, बसप कोणत्याही स्थितीत देशातील कोणत्याही राज्यात काँग्रेससोबत आघाडी करणार नाही.

लोकसभा निवडणूक 2019 साठी उत्तर प्रदेशमध्ये मायावती यांच्या बसपाची अखिलेश यादव यांच्या समाज पक्षासोबत आघाडी आहे. सपा-बसपाच्या या आघाडीमध्ये रालोदला तीन जागा सोडण्यात आल्या आहेत. तर, रायबरेली आणि अमेठी मतदारसंघातून उमेदवार न देण्याचाही दोन्ही पक्षांनी निर्णय घेतला आहे. रायबरेली येथून काँग्रेसच्य माजी अध्यक्षा सोनिया गांधी तर, अमेठी मतदारसंघातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी निवडणूक लढवत आहेत. (हेही वाचा, बहुजन वंचित आघाडी 48 जागांवर उमेदवार उभे करणार; काँग्रेससोबत आघाडी नाही: प्रकाश आंबेडकर)

उत्तर प्रदेशमध्ये समाज पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने आघाडी केल्यानंतर एनडीए विरोधात बसप काही राज्यांमध्ये काँग्रेससोबत आघाडी करेल अशी चर्चा होती. खास करुन मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये ही आघाडी होईल अशी चर्चा होती. मात्र, या चर्चेला आता पूर्ण विराम मिळाला आहे.