कर्नाटक राज्यात टीपू सुलतान जयंती रद्द; BS Yediyurappa सरकारचा निर्णय
Tipu Sultan Portrait | File Image | (Photo Credits: Wikimedia Commons)

कर्नाटकामध्ये मागील अनेक वर्षांपासून टीपू सुल्तान यांच्य जयंतीवरून (Tipu Jayanti) वाद रंगले होते. आज कर्नाटकचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री येडीयुरप्पा (BS Yediyurappa) यांनी टीपू सुल्तान यांची जयंती साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. काल येडियुरप्पा यांच्या मंत्रिमंडळामध्ये टीपू सुलतान यांची जयंती साजरी करण्याला विरोध दर्शवण्यात आला होता. भाजपा आमदार बोयप्पा यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला होता. कर्नाटकामध्ये कॉंग्रेस आणि जेडीएस सराकार मोठ्या उत्साहात टीपू सुल्तान जयंती साजरी करत होते.

येडियुरप्पा यांच्या सरकारच्या या निर्णयावर समाजातून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. काही दिवसांपूर्वी कर्नाटकच्या विधानसभेत एच. डी. कुमारस्वामी यांचं सरकार कोसळलं आणि येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. BS Yediyurappa कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान; चौथ्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

ANI Tweet

कोण होता टीपू सुलतान?

टीपू सुलतान हा 18 व्या शतकातील म्हैसूरचा शासक होता. दरवर्षी 10 नोव्हेंबर दिवशी त्याची जयंती साजरी केली जाते. मात्र टीपू सुलतान हा मुस्लिम शासक होता. त्याने अनेक हिंदूंचे धर्मांतर केले, मंदिरे तोडली असा इतिहास असल्याचे काही संघटनांची मतं आहेत. त्यामुळे पूर्वीपासूनच टीपू सुल्तानच्या जयंतीला भाजपाचा तीव्र विरोध होता.