B S Yediyurappa (Photo Credits: IANS)

कर्नाटक विधानसभेत एच.डी. कुमारस्वामी (H. D. Kumaraswamy) यांना बहुमत सिद्ध करता न आल्याने काँग्रेस-जेडीएसचं सरकार कोसळलं आणि कुमारस्वामींना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. कुमारस्वामी यांच्या राजीनाम्यानंतर आता भाजपा सत्ता स्थापन करणार असून आज (26 जुलै) कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदी बी. एस. येडियुरप्पा ( B.S. Yediyurappa) विराजमान झाले. बंगळुरु येथील राजभवनात त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधीपूर्वी येडियुरप्पा यांनी कडू मल्लेश्वरा मंदिरात (Kadu Malleshwara Temple) जावून दर्शन घेतले. आज (26 जुलै) गर्व्हनरांची भेट घेऊन संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती दिली होती.

कर्नाटक विधानसभेत 23 जुलै रोजी विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. यात काँग्रेस, जेडीएसच्या बाजूनं 99 आमदारांनी मतदान केलं. तर 105 मतं सरकारच्या विरोधात गेली. त्यामुळे कुमारस्वामींना सत्ता सोडावी लागली. (कर्नाटक मुख्यमंत्री कुमारस्वामी बहुमत सिद्ध करण्यात अपयशी; काँग्रेस-जेडीएस चं सरकार कोसळलं)

ANI ट्विट:

कुमारस्वामींच्या हातून सत्ता गेल्यानंतर सर्वांचे लक्ष कर्नाटकातील राजकीय घडामोडींकडे लागले होते. मात्र कुमारस्वामींचे सरकार कोसळल्यानंतर भाजप कार्यकर्त्ये, आमदार यांच्याकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला होता.