BJP VS Congress: राहुल गांधींच्या 41 हजारांच्या टीशर्ट वरुन भाजप विरुध्द कॉंग्रेस ट्वीटर वॉर

नुकतीच कॉंग्रेसच्या (Congress) भारत जोडो (Bharat Jodo) यात्रेला सुरुवात झाली आहे. ही यात्रा कॉंग्रेस पक्षाकडून कन्याकुमारी (Kanyakumari) ते कश्मीर (Kashmir) पर्यत काढण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली होती. या यात्रेला सुरुवात झाली पण विरोध म्हणजे भाजपाकडून (BJP) कॉंग्रेसच्या यात्रेवरुन टोलेबाजी केल्या जात आहे. विविध माध्यमातून कॉंग्रेसला कैचीत पकडण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. काल भारत जोडो यात्रेदरम्यान कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पांढऱ्या रंगाचा टी शर्ट परिधान केला होता. राहुल गांधींच्या त्या टीशर्टचा फोटो भाजपने त्यांच्या अधिकृत ट्वीटर (Tweeter) हॅंडलवर ट्वीट (Tweet) केला आहे. ज्यात राहुल गांधींनी घातलेला टीशर्टची (T-shirt) किम्मत तब्बल 41 हजारांहून अधिक असल्याची माहिती दिलेली आहे. तसेच मिश्कीलपणे या फोटोला भारत देखो असा कॅप्शन (Caption) देण्यात आला आहे.

 

पण यावेळी कॉंग्रेसने (Congress) भाजपच्या (BJP) या ट्वीटला सडेतोड उत्तर दिलं आहे. कॉंग्रेसकडून त्यांच्या अधिकृत ट्वीटर (Tweeter) हॅंडलवर ट्वीट (Tweet) करत प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. कॉंग्रेसने ट्वीट केलं आहे, अरे घाबरलात का भारत जोडो यात्रेतील नागरिकांचा उत्सफूर्त प्रतिसाद बघून जे काही बोलायचं ते मुद्द्याचं बोला आणि कपड्यांबाबत बोलाचं झालं तर मग पंतप्रधान मोदींच्या (PM Modi) 10 लाखांच्या सूट पासून तर दीड लाखांच्या चश्म्याबाबत पण बोलूया. असं सडेतोड उत्तर कॉंग्रेस कडून भाजपाला देण्यात आलं आहे. (हे ही वाचा:- Supreme Court: पत्रकार सिद्दीक कप्पनला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, हाथरस प्रकरणी जामीन मंजूर)

 

राजकीय मंडळींसाठी हे फक्त ट्वीटर वॉर असु शकत. यातून सहजरित्या एकमेकांवर निशाणा साधता येवू शकतो. पण सर्वसामान्याना ही बाब खरचं लक्षात घेण्यासारखी आहे की जर खरचं भाजपच्या आरोपांप्रमाणे राहुल गांधींची टीशर्ट 41 हजारांहून अधिक किमतीची असेल तर किंवा कॉंग्रेसच्या आरोपांप्रमाणे पंतप्रधान मोदींचा सूट 10 लाखांचा आणि चश्मा दीड लाखांचा असेल तर? राजकीय नेते एकमेकांवर निशाणा साधतील आणि मोकळे होतील पण यात भरडला शेवटी सर्वसामान्य माणूस जाईल कारण तो नाही 41 हजारांची टीशर्ट घेवू शकत किंवा नाही दीड लाखांचा चश्मा. त्यामुळे आता या टीशर्टचा वाद फक्त राजकीय राहिला नसून नेटकऱ्यांकडून कॉंग्रेससह भाजप या दोन्ही पार्टी बाबत मिम्स शेअर केल्या जात आहे.