पंतप्रधान मोदी आणि अमित शहा (फोटो सौजन्य- PTI)

Lok Sabha Election Results 2019: लोकसभा निवडणूक 2019 चे अंतिम निकाल काही तास उरले असतानाच भाजप समर्थकांचा देश-विदेशापर्यंत जल्लोष सुरु झाला आहे. आतापर्यंत आलेल्या मतमोजणीच्या कलानुसार एकूणच पुन्हा मोदी लाट येण्याची संकेत मिळत आहेत. त्या संबंधी सविस्तर चर्चा करण्यासाठी आज संध्याकाळी 5.30 वाजता भाजपच्या संसदीय मंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे. ह्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. ह्या बैठकीचे स्वरुप स्पष्ट झाले नसून आपल्या पक्षाची पुढील वाटचाल कशी असेल याची रुपरेषा आखण्यासंबंधीची ही बैठक असेल असा अंदाज व्यक्त केला जातोय.

Lok Sabha Elections Results 2019 Saam TV LIVE NEWS STREAMING: लोकसभा निवडणूक निकाल 2019, इथे पहा लाईव्ह

आतापर्यंतच्या हाती आलेल्या निकाल फेरीवरुन NDA बहुमत मिळेल असेच चित्र दिसत आहे. तसेच काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते पिछाडीवर असल्यामुळे भाजपचे सरकार येईल अशी चर्चा राजकीय वर्तुळापासून जनतेमध्येही सुरु झाली आहे. मात्र तरीही काही राज्यांत अजूनही UPA आणि अन्य पक्ष आघाडीवर असल्यामुळे संपुर्ण चित्र हाती आले नाही असच म्हणता येईल. मात्र भाजपाने आपला विजय पक्का समजला असून त्यासंबंधी पुढील रुपरेषा ठरविण्यासाठी आज बैठक बोलावली आहे. आता पाहायचे की, ही बैठक भाजपाच्या अपेक्षित निकालाविषयी असेल की अनपेक्षित जागांवरील पराभवाबद्दल, हे लवकरच कळेल.

Lok Sabha Electionms 2019 Results: भारतीय जनता पक्षाच्या आघाडीचं सेलिब्रेशन थेट ऑस्ट्रेलियात, भारतीय नागरिकांनी निकाल पाहत साजरा केला आनंद

 

देशामध्ये यंदा 11 एप्रिल ते 19 मे दरम्यान सात टप्प्यांमध्ये मतदान पार पडलं. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 20 राज्यांतील 91 मतदारसंघ, दुसऱ्या टप्प्यात 14 राज्यांतील 97 मतदारसंघ, 3ऱ्या टप्प्यात 14 राज्यातील 115 मतदारसंघ, 4थ्या टप्प्यात 9 राज्यातील 71 मतदारसंघ, 5व्या टप्प्यात 7 राज्यांत 51 मतदारसंघ, 6व्या टप्प्यात 7 राज्यातील 59 मतदारसंघात आणि 7 व्या टप्प्यात 8 राज्यातील 59 मतदासंघात अनुक्रमे 11 एप्रिल, 18 एप्रिल, 23 एप्रिल, 29 एप्रिल, 6 मे, 12 मे आणि 19 मे रोजी मतदान पार पडले.