लोकसभा निवडणूक 2019 (Loksabha Elections 2019) चे निकालपर्व सुरु होऊन आता काही तास उलटून गेले असून सकाळी आठ वाजल्यापासूनच निकालाचे प्राथमिक कल हाती यायला सुरवात झाली आहे. या कलांच्या आधारावर सध्या देशभरात भारतीय जनता पक्षाने जोरदार आघाडी घेत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. देशात या निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहचली असून बीजीपी समर्थक असलेल्या सामान्य नागरिकनांच्या आनंदाला पारावर उरलेला नाही पण मोदींच्या आघाडीची चर्चा केवळ देशापुरतीच मर्यादित नसून थेट सातासमुद्रापार दुमदुमत आहे. ऑस्ट्रेलिया (Australia) तील भारतीय नागरिक देखील निकालाचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी एकत्र जमले असून बीजेपीला मिळणाऱ्या आघाडीचा आनंद साजरा करताना दिसणारे एक ट्विट सध्या सोशल ANI ने शेअर केले आहे.
जाणून घ्या महाराष्ट्रासह संपूर्ण भारताचा निकाल एका क्लिकवर, पाहा लाइव अपडेट्स
अशातच प्रप्त माहितीनुसार मोदींच्या नेतृत्वाखालील बीजेपीला 300 पेक्षा जास्त जागांवर आघाडी प्राप्त झाली आहे. याचे सेलिब्रेशन करण्यासाठी ऑस्ट्रेलियातही बीजेपी समर्थकांनी एकत्र येऊन आनंद साजरा करत आहेत. ट्विटमध्ये असणाऱ्या प्रतिमेनुसार एक मोठी प्रोजेक्टर स्क्रीन लावून एकत्र निकाल पाहण्याचे ठरवलेली मंडळी पाहायला मिळत आहेत. यामध्ये तरुणनंमपासून ते ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटो यामध्ये हीच मंडळी नाचत आनंद साजरा करताना बघायला मिळतायत. यावरून मोदी देशाचे पुन्हा एकदा पंतप्रधान होण्याच्या कल्पनेने जनमानसात किती आनंद आहे याचा अंदाज घेता येऊ शकतो.
ANI ट्विट
#ElectionResults2019: Bharatiya Janata Party supporters in Australia's Sydney and Melbourne celebrate as trends show party leading on 292 seats. pic.twitter.com/WphGVy1KeP
— ANI (@ANI) May 23, 2019
दरम्यान देशभरात महत्वाच्या अनेक मतदारसंघात काँग्रेस व आघाडीचा प्रचाराच्या दिवसात दिसून आलेला जोर काही मोठा फरक पडू शकला नसल्याचे समजत आहे. अमेठी सह अन्य अनेक संभाव्य विजयाच्या जागांवर राहुल गांधी यांची काँग्रेस आघाडी जिंकण्याची फार कमी संधी असल्याची चर्चा देशभरात ऐकू येतेय. आज संध्यकाळ पर्यंत या निकालाची संपूर्ण माहिती हातात येऊ शकते आणि त्यानानंतरच देशाच्या पंतप्रधानपदी कोण बसणार याविषयी शिक्कामोर्तब केला जाणार आहे.