भोपाळ (Bhopal) मतदार संघातून विजयी झालेल्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञा (Sadhvi Pragya) यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचा मारेकरी नथुराम गोडसे (Nathuram Godse) यांना देशभक्त असल्याचे म्हटले होते. त्यानंतर साध्वी प्रज्ञा यांच्या या वादग्रस्त विधानानंतर कारणेदाखवा नोटीस धाडण्यात आली.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानसुद्धा साध्वी प्रज्ञा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे भाजपची कोंडी झाली होती. त्यामुळे आता यापुढे पक्षशिस्त पाळणार असल्याचे म्हटले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची इच्छा साध्वी प्रज्ञा यांनी व्यक्ती केली आहे.('नथूराम गोडसे देशभक्त', भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांचे वादग्रस्त विधान)
मात्र साध्वी प्रज्ञा यांनी नथुराम गोडसे यांच्यावरुन केलेल्या विधानामुळे मोदी आणि अमित शहा यांनी त्यांना सुनावले होते. तसेच मोदी यांनी साध्वी यांना त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे कधीच माफ करणार नसल्याचे म्हटले होते.