Bihar Assembly Election 2020: बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी सोडली महागठबंधनची साथ
Jitan Ram Manjhi | (File Photo)

बिहार विधानसभा निवडणूक 2020 (Bihar Assembly Election 2020) तोंडावर येऊन ठेपल्याने राजकीय पक्षांमध्ये जोरदार हालचाल सुरु झाल्या आहेत. आघाडी, युती आणि समविचारी पक्षांची जमवाजमव, मतभेद, संघर्ष अधिक उफाळून येऊ लागले आहेत. अशातच विधासभा निवडणुकीस सामोरे जाण्यापूर्वीच विरोधकांना मोठा झटका बसला आहे. हिंदुस्तानी अवाम मोर्चा (Hindustani Awam Morcha) महागठंधन मधून बाहेर पडला आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी (Jitan Ram Manjhi) यांच्या नेतृत्वाखाली 'हम' (HAM) हा महागठंधनमधील एक महत्त्वाचा घटक पक्ष आहे.

जीतन राम मांझी यांच्या नेतृत्वाखाली हम पक्षाची एक महत्त्वाची बैठक पाटना येथे पार पडली. यात पक्षाच्या कोअरकमिटीसोबत ज्येष्ठ नेत्यांचा समावेश होता. या वेळी महागठंधनमधून बाहेर पडण्यासा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर पक्षाचे प्रवक्ते दानिष रिजवान यांनी पत्रकारांना सांगितले की, आगामी काळात पक्ष स्वबळावर निवडणूक लढणार की इतर कोणत्या पक्षासोबत आघाडी करणार याबाबतचा निर्णय पक्षाचे प्रमुख जीनत राम मांझी यांच्यावर सोडण्यात आला आहे. रिजवान यांनी प्रश्न उपस्थित केला की, महागठंधन मधील जे लोक खुद्द गठबंधनधीलच लोकांचे ऐकत नाहीत, ते सत्तेत गेल्यावर जनतेचे तरी कसे ऐकतील? (हेही वाचा, बिहार: भाजप समर्थकांना बदडले, खासदारांनाही धक्काबुक्की? संतप्त पूरग्रस्तांचा कथीत व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल)

जीतन राम मांझी यांचा हम हा पक्ष महागठंधनमध्ये एक समन्वय समिती स्थापन करावी अशी मागणी सातत्याने करत आला आहे. बिहारच्या राजकीय वर्तुळात असेही बोलले जात आहे की, मांझी यांचा पक्ष लवकरच राजगमध्ये सहभागी होऊ शकेल. मात्र, मांझी यांचे बाहेर पडणे हे गठबंधनसाठी एक मोठा झटका मानला जात आहे. राष्ट्रीय जनताल दल, काँग्रेस, विकासशील इंसान पार्टी, राष्ट्रीय लोक समता पार्टी आणि मांझी यांचा हम या पक्षांनी एकत्र येत महाआघाढी तयार केली होती.