A R Antulay | (File Image)

Political Career Of Barrister A R Antulay: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले (Barrister A R Antulay) यांचा आज स्मृतीदिन (Barrister A R Antulay Jayanti) आहे. त्यानिमित्त त्यांना विविध राजकीय नेत्यांनी अभिवादन केले आहे. अंतुले हे महाराष्ट्राचे आठवे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये केंद्र सरकारमधील पहिले अल्पसंख्याक मंत्री होते. महाराष्ट्रामध्ये ते जून 1980 ते जानेवारी 1982 या कालावधीत मुख्यमंत्री तर सन 2006 ते 2009 या कार्यकाळात ते केंद्रात मत्री राहिले आहेत. त्यांची एकूण राजकीय कारकीर्द विविध कारणांमुळे चर्चेत राहिली. खास करुन सिमेंट घोटाळ्यात नाव आल्यामुळे त्यांना 1982 मध्ये मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.

1980 ते 1982 या काळात मुख्यमंत्री

अब्दुल रहमान अंतुले यांचा यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील आंबेत येथे झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठात काही काळ शिक्षण घेतले. त्यानंतर ते बॅरिस्टरची पदवी घेण्यासाठी लंडन येथे गेले. ते परत आल्यावर त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश केला. 1962 पासून त्यांनी राज्याच्या राजकारणात सक्रीय सहभाग नोंदवला. त्याच वर्षी त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली. ज्यामध्ये ते विजयी झाले. पुढे ते सलग दोन टर्म म्हणजेच 1962 ते 1976 या कालावधीत आमदार राहिले. दरम्यान, ते राज्यसभेवर गेले. मात्र, 1980 मध्ये ते पुन्हा विधानसभेवर निवडून आले. या वेळी त्यांच्यासाठी नशीब, राजकीय चतुराई आणि पक्ष संघटना, हायकमांड अशा एकूण सर्वच बाबी अनुकुल होत्या. राज्याच्या मुख्यमंत्री पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. ते 1980 ते 1982 या काळात मुख्यमंत्री राहिले. मात्र, अचानक सिंमेंट घोटाळ्याचे प्रकरण पुढे आले आणि त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. (हेही वाचा, रायगड: बॅ. ए. अर. अंतुले यांचे चिरंजीव नविद अंतुले यांचा शिवसेनेत प्रवेश; सुनील तटकरे यांच्या अडचणी वाढल्या)

प्रशासकीय कुशाग्रतेसाठी विशेष लोकप्रिय

प्रशासकीय कुशाग्रतेसाठी ओळखले जाणारे अंतुले हे तडफदार व्यक्तीमत्व होते. पदभार स्वीकारल्यानंतर ताबडतोब त्यांनी अनेक मोठ्या जिल्ह्यांचे विभाजन करण्याचे आदेश दिले. जे प्रशासकीयदृष्ट्या नियंत्रणात नव्हते. सार्वजनिक बांधकाम आणि पाटबंधारे मंत्रालयांच्या कामकाजात अनेक सुधारणांचे श्रेयही त्यांना जाते. मुख्यमंत्री शरद पवार हे दिल्लीला गेल्यानंतर अंतुले यांनी मुख्यमंत्री म्हणून राज्याच्या नेतृत्वाची सूत्रे हाती घेतली. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर बाबासाहेब भोसले हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. अंतुले यांनी आयुष्यभर काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतला. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांचे चिरंजीव नविद अंतुले यांनी अलिकडेच काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

एक्स पोस्ट

अनंत गीते यांच्याकडून पराभव

दरम्यान, अंतुले हे 1989 पर्यंत आमदार राहिले. पुढे नवव्या लोकसभेवर ते निवडून गेले आणि जवळपास 1998 पर्यंत खासदार राहिले. मात्र, तोवर राज्यातील आणि खास करुन त्यांच्या रायगड लोकसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती बदलली होती. सन 2004 मध्ये ते लोकसभेवर निवडून आले. मात्र, त्यापुढच्या म्हणजेच लोकसभा निवडणूक 2009 मध्ये रायगड मतदारसंघातून शिवसेना उमेदवार अनंत गीते यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. पुढे प्रकृती आणि राजकीय परिस्थिती अंतुले यांच्यासाठी बरीचशी प्रतिकूल राहिली. त्यांना मुत्रपिंडाचा अजार जडला. या आजारातच उपचार घेत असताना मुंबई येथे 2 डिसेंबर 2009 रोजी त्यांचे निधन झाले.