Arun Jaitley First Death Anniversary: PM नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह मान्यवरांकडून अरूण जेटलींना श्रद्धांजली !
Arun Jaitely (Photo Credits: PTI)

भारताचे माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपा नेते अरूण जेटली (Arun Jaitley) यांची आज (24 ऑगस्ट) पहिली पुण्यतिथी आहे. वर्षभरापूर्वी अरूण जेटली यांचे दीर्घ आजाराने वयाच्या 66 व्या वर्षी निधन झाले होते. आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांनी ट्वीटरच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करताना 'मी माझ्या मित्राला खूप Miss करतो' अशा शब्दांत भावना मोकळ्या करत आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), पूनम महाजन, जे पी नड्डा यांनी देखील ट्वीटरच्या माध्यमातून अरूण जेटली यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

अरूण जेटली यांचा जन्म 28 डिसेंबर 1952 दिवशी झाला होता. तर निधन 24 ऑगस्ट दिवशी झाले. त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. मात्र नंतर काही वर्षांत त्यांना कॅन्सरने ग्रासले होते. त्यामध्येच त्यांचे निधन झाले.

नरेंद्र मोदी ट्वीट

अमित शाह ट्वीट

जे पी नड्डा ट्वीट

पूनम महाजन ट्वीट

1991 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाशी स्वत:ला जोडून घेतले. पुढील काही वर्ष सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी पक्षकार्य त्यांच्यावर 1999 मध्ये त्यांच्यावर भाजप पक्ष प्रवक्ता पदाची जबाबदारी आली. दरम्यान, 1999 मध्ये अटल बिहारी वाजपेयी सरकार सत्तेवर आल्यानंतर माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री म्हणून स्वतंत्र कार्यभार हाती घेतला. त्यांच्याकडे गुंतवणूक राज्यमंत्री पदाचा कार्यभारही होता. अरुण जेटली यांची केंद्रीय अर्थमंत्री म्हणून कामगिरी संमिश्र राहिली. नोटबंदी, जीएसटी हे त्यांच्या कार्यकाळातील अर्थव्यवस्थेशी संबंधीत सर्वात मोठे निर्णय ठरले.