Delhi CM Arvind Kejriwal waves to AAP workers as party wins Delhi Assembly Elections 2020 (Photo Credits: IANS)

आम आदमी पक्षाचे (AAP) अध्यक्ष अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी दिल्ली विधानसभा निवडणूकीत दणदणीत विजय मिळवला आहे. अरविंद केजरीवाल हे तिसऱ्या वेळेस मुख्यमंत्री पदी विराजमान होणार असून त्याचा शपथविधी 16 फेब्रुवारीला पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला दुसऱ्या राज्यांतील बड्या राजकिय नेत्यांना आमंत्रण देण्यात आलेले नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अरविंद केजरीवाल यांनी शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रण दिले आहे. यापूर्वी बुधावारी आमदारांसोबत पार पडलेल्या बैठकीत सर्वांच्या संमतीने गटनेत्याची निवड करण्यात आली.

दिल्लीतील रामलीला मैदानात सकाळी 10 वाजता शपथविधी सोहळा पार पडणार आहे. तर तिसऱ्या वेळेस पुन्हा अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री पदासाठी शपथ घेणार आहेत. केजरीवाल यांनी पहिल्या वेळेस 28 डिसेंबर 2013, दुसऱ्या वेळेस 14 फेब्रुवारी 2015 मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. अरविंद केजरीवाल यांनी नवे सरकार स्थापन करण्यासाठी बुधवारी संध्याकाळी उपराज्यपालांची भेट घेतली. केजरीवाल यांच्यासोबत त्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री सुद्धा 16 तारखेला शपथ घेणार आहेत. गेल्या सरकारमध्ये मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, गोपाल राय, कैलाश गहलोत, इमरान हुसैन आणि राजेंद्र पाल गौतम हे त्यांच्या मंत्रीमंडळात होते. शपथविधी सोहळ्यानंतर मंत्र्यांना पद वाटून देण्यात येणार आहेत.(दिल्ली: अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्याला बेबी मफलरमॅनला आमंत्रण)

ANI Tweet:

आम आदमी पार्टीकडून शपथविधी सोहळ्यासाठी जवळजवळ दोन कोटी लोकांना आमंत्रण देण्यात आले आहे. आप पक्षाचे वरिष्ठ नेता मनीष सिसोदिया यांनी पक्षाच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेत आमदारांच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली होती. दिल्लीत 8 फेब्रुवारीला 70 जागांसाठी मतदान पार पडले. या विधानसभा निवडणूकीचा निकाल 11 फेब्रुवारीला लागला असून आम आदमी पार्टीला 62 जागांवर विजय मिळवता आला आहे. तर भाजपला 8 आणि काँग्रेस पक्षाला पराभव स्विकारावा लागला आहे.