बेरोजगार ब्राम्हण तरुणांना मिळणार शानदार कार, चंद्रबाबू नायडू यांची घोषणा
चंद्राबाबू नायडू (Photo Credits: PTI)

2019 मधील लोकसभा निवडणूकीपूर्वीच आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू (N. Chandrababu Naidu) यांनी बेरोजगार ब्राम्हण तरुणांना स्विफ्ट डिझायर (Swift Dzire) कार देणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. तर यापूर्वी नायडू यांनी राज्यातील जनतेला स्मार्टफोन देणार असल्याची घोषणा केली होती.

स्विफ्ट डिझायर ही कार स्वरोजगार योजनेअंतर्गत बेरोजगार तरुणांना दिली जाणार आहे. तसेच ब्राम्हण समाजातील तरुणांना सध्या ही कार देण्यात येणार असल्याते रिपोर्ट्सच्या माध्यमातून सांगितले जात आहे. तसेच खुद्द नायडू हे तरुणांना या कारच्या चावीचे वाटप करताना दिसून येणार आहेत. तसेच एक स्मार्टफोनचे ही वाटप करण्यात येणार आहे.

अधिकाऱ्यांकडून असे सांगितले जात आहे की, दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम ब्राम्हण वेल्फेअर कॉर्पोरेशन कडून देण्यात येणार आहे. तर 10% रक्कम तरुणांना या कारसाठी मोजावी लागणार आहे. तर उर्वरित रक्कम आंध्र प्रदेश सरकार ब्राम्हण क्रेडिट सोसायटीच्या तर्फे लोनच्या माध्यमातून भरणार आहे.