दिल्लीत सुरु असलेल्या चंद्रबाबू नायडू यांच्या उपोणादरम्यान एका व्यक्तीची आत्महत्या
चंद्रबाबू नायडू (फोटो सौजन्य-ANI)

आंध्र प्रदेशाला (Andhra Pradesh) विशेष राज्याचा दर्जा मिळायला हवी अशा मागणीसाठी तेलगू दसम पार्टीचे प्रमुख आणि मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी सोमवारी उपोषणाला बसण्याचे ठरविले. तसेच दिल्लीतील केंद्र सरकार विरुद्ध लाक्षणिक उपोषणास सुरुवात केली आहे. मात्र उपोषणाला हिंसक वळण लागले असून एका व्यक्तीने आंध्र प्रदेशाच्या भवनाबाहेर आत्महत्या केली आहे.

आत्महत्या करणारा व्यक्ती हा आंध्र प्रदेशातील रहिवाशी असून त्याच्याजवळ एक सूसाईड नोट पोलिसांना आढळून आली आहे. तसेच मोदी सरकारने दिलेली आश्वासने फोल ठरवत ती पूर्ण न केल्याने मोदी यांच्या कालच्या रॅलीनंतर आज लगेच नायडू उपोषणाला बसले आहेत. (हेही वाचा- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आंध्र प्रदेशात दौऱ्यावर, राज्यात झळकले 'No More Modi' पोस्टर)

तसेच आघाडी सरकावर टीका करत राज्याला विशेष दर्जा लागू न केल्यास येथील स्थानिकांच्या स्वाभिमानावर हल्ला झाला असल्याचे नायडू यांनी म्हटले आहेत तसेच काँग्रेस पक्षाकडून नायडू यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला जात आहे.