दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या आम आदमी पक्षाच्या आमदार अलका लांबा (Alka Lamba) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत दिले आहेत. सेशल मीडिया अकाऊट ट्विटर आणि फेसबुकवर एक पोस्ट लिहीत लांबा यांनी हे संकेत दिले. तत्पूर्वी आम आदमी पक्षाच्या आमदारांच्या Whatsapp Group मधून आपल्याला काढल्याचा आरोप लांबा यांनी केला आहे. सोशल मीडिया अकाऊंटवर लिहिलेल्या पोस्टवर 2013 ला सुरु झालेला प्रवास 2020 मध्ये संपवत असल्याचे लांबा यांनी म्हटले आहे. परंतू, पक्षातील तळागाळातील कार्यकर्त्यासोबत आपले संबंध आणि प्रेम कायम राहिल असेही त्यांनी म्हटले आहे.
काय म्हटले आहे लांबा यांनी?
अलका लांबा यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, '2013 मध्ये सुरु झालेला माझा प्रवास 2020 मध्ये समाप्त होत आहे. पक्षासाठी कार्य करणाऱ्या तळागाळातील नेत्यांसोबत माझ्या भावना कायम जोडलेल्या आहेत. मी आशा करते की दिल्लीसाठी आप एक मजबूत पर्याय म्हणून उभा राहीन. खूप खूप शुभेच्छा. गेली 6 वर्षे मला नेहमी आठवणीत राहतील. या काळात मला खूप शिकायला मिळाले.' (हेही वाचा, आतापर्यंत कोणी-कोणी सोडली आम आदमी पक्षाची साथ?)
2013 में आप के साथ शुरू हुआ मेरा सफ़र 2020 में समाप्त हो जायेगा।
मेरी शुभकामनाएं पार्टी के समर्पित क्रांतिकारी ज़मीनी कार्यकर्ताओं के साथ हमेशा रहेगीं, आशा करती हूं आप दिल्ली में एक मजबूत विकल्प बने रहेगें।
आप के साथ पिछले 6साल यादगार रहगें-
आप से बहुत कुछ सीखने को मिला।
आभार।
— Alka Lamba (@LambaAlka) May 25, 2019
@AAPDelhi के व्हाट्सऐप ग्रुप से चांदनी चौक से विधायक @LambaAlka को किया गया बाहर, जल्द दे सकती हैं पार्टी से इस्तीफा! वॉट्सऐप ग्रुप में पार्टी प्रमुख @ArvindKejriwal भी है शामिल
उत्तर पूर्वी दिल्ली से आप के उम्मीदवार रहे @dilipkpandey ने किया बाहर । #whatsapp#AlkaLamba pic.twitter.com/peYMtcUNxs
— Tarun Sharma (@tarun10sharma) May 26, 2019
दरम्यान, ही पोस्ट लिहिण्यापूर्वी लांबा यांनी दावा केला होता की, पक्ष आमदारांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून आपल्याला पुन्हा एकदा हटविण्यात आले आहे. या व्हॉट्सएपग्रुपमध्ये अरविंद केजरीवाल हेसुद्धा सहभागी आहेत. लांबा यांनी दावा केला आहे की, ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना पाचव्या कार्यकाळासाठी मिळालेल्या विजयावर शुभेच्छा देण्याऐवजी मला (लांबा) व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढले आहे. अशी पावले टाकणे हे नेतृत्वासाठी योग्य नाही.