Video: शेतात गवत कापण्याची अॅक्टींग करताना मजा आली: हेमा मालिनी
BJP MP Hema Malini | ( (Photo credit: Twitter/@dreamgirlhema)

Lok Sabha Elections 2019: लोकप्रिय अभिनेत्री आणि मथुरा (Mathura) येथील खासदार हेमा मालिनी (BJP MP Hema Malini) यांची शेतात गवत कापत असतानाची छायाचित्रं सोशल मीडियात सध्या प्रचंड व्हायरल झाली आहेत. काहींनी या छायाचित्रांचे कौतुक केले तर, बहुतेकांनी ही केवळ नैटंकी असल्याचे सांगत टीकाही केली. हेमा मालिनी ट्रॅक्टर चालवत असल्याचेही एक छायाचित्र व्हायरल झाले आहे. या सर्व टीका टिप्पणीवर स्वत: हेमा मालिनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही प्रतिक्रिया देताना, 'मुंबईत राहून कदाचीत तुम्हाला त्यातली मजा कळणार नाही. पण, शेतात जाऊन शेतकऱ्यांसोबत, कष्टकरी महिलांसोबत काम केल्यावर एक वेगळा आनंद मिळतो. शेतात काम करण्याचा, गवत कापण्याचा मी अभिनय (अॅक्टींग) केला आहे. ही अॅक्टींग करताना मला जाम मजा आली', असे हेमा मालिनी यांनी म्हटलेआहे.

एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला हेमा मालिनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हेमा मालिनी या भाजपच्या मधुरा येथील खासदार आहेत. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये भाजपने पुन्हा एकदा हेमा मालिनी यांना मथुरा लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. त्यामुळे हेमा मालिनी या सध्या निवडणूक प्रचारात व्यग्र आहेत.

दरम्यान, निवडणूक प्रचारात लोकसंपर्काचा भाग म्हणून हेमा मालिनी यांनी नुकतीच त्यांच्या मतदारसंघाचा दौरा केला. यात त्यांनी शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांचीही भेट घेतली. या वेळी त्यांनी शेतकरी महलांसोबत गवत कापण्याचा प्रयत्न केला. अर्थात हा प्रयत्न केवळ छायाचित्रांमधून स्वत:ची छबी टीपण्यापूरताच होता. त्यामुळे हेमा मालिनी यांनी केवळ नाटक केले अशी टीका करत सोशल मीडयावर हेमा मालिनी यांची छायाचित्रे सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आली. (हेही वाचा, अखेर भाजपचे माजी बंडखोर नेते शत्रुघ्न सिन्हा यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश; पाटना-साहिब इथून लढणार निवडणूक)

आपल्यावर होणाऱ्या टीकेबाबत बोलताना हेमा मालिनी म्हणाल्या, 'गवत कापतानाची अॅक्टींग करताना खूप मजा आली. मुंबईमध्ये अशा पद्धतीचे शेत, गव दिसत नाही. त्यामुले निवडमूक प्रचारादरम्यान गावात जाते तेव्हा अशा पद्धतीचा माहोल पाहाला मिळतो. मी शेतात जाऊन गवत कापण्याची अॅक्टींग जरी केली असली तरी, त्यातही मला मजा आली. यात काहीही वाईट नाही', असेही हेमा मालिनी यांनी म्हटले आहे.