Nawab Malik On Devendra Fadnavis: शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर नवाब मलिकांनी साधला फडणवीसांवर निशाना
Nawab Malik & Devendra Fadnavis (Photo Credit - PTI)

भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. या टीकेवर राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या प्रत्युत्तरानंतर आता पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनीही फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवारांनी यापूर्वी कात्रजचा घाट दाखवला होता, आणि आताही ते बोलत राहिले तर पवार साहेब काशीचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा नवाब मलिक यांनी फडणवीसांना दिला आहे. शरद पवार यांचा राष्ट्रवादी हा साडेतीन जिल्ह्यांपुरता मर्यादित असलेला पक्ष असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर अजित पवारांनी फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यानंतर आता नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

Tweet

मग फडणवीस विधानसभेत निवडूनही आले नाहीत

शरद पवार मुख्यमंत्री असताना फडणवीस कधीच विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले नाहीत. कालपर्यंत राज्यात 25 ते 30 जागांवर निवडणुका होत होत्या, आता ते पवारांवर भाष्य करत आहेत. याआधीही फडणवीस पवारांवर भाष्य करत होते. नंतर काय झाले? याची आठवणही नवाब मलिक यांनी फडणवीस यांना करून दिली.

सुप्रिया सुळे यांचा फडणवीसांना सणसणीत टोला

फडणवीसांच्या त्या टीकेबद्दल पुण्यात आज पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांना विचारलं. त्यावर त्यांनी अत्यंत मार्मिक प्रतिक्रिया दिली. 'फडणवीसांच्याच पक्षाच्या केंद्रातील सरकारनं शरद पवार यांना पद्म पुरस्कार दिलाय. पवार साहेबांबद्दल बोलताना फडणवीस हे विसरले असावेत,' असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. (हे हि वाचा Pune: शरद पवारांच्या मेट्रो ट्रायलनंतर चंद्रकांत पाटलांचा सवाल, मेट्रो कंपनीवर हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार)

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पश्चिम महाराष्ट्रातील साडेतीन जिल्ह्यांपुरता मर्यादित आहे. पक्षाचे नाव राष्ट्रवादी असल्याने त्यांचा पक्ष राष्ट्रवादी होत नाही. 'पानी तेरा रंग कैसे, जिस में मिला के लिए' असा शरद पवारांचा पक्ष आहे. कधी सपाशी बोलतो तर कधी तृणमूल काँग्रेसशी बोलतो. त्यांच्या पक्षाला राष्ट्रीय अस्मिता नाही किंवा राष्ट्रीय विचारधाराही नाही. नाव राष्ट्रवादी असले तरी पश्चिम महाराष्ट्रापुरता मर्यादित असलेला पक्ष असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.