ABP C-Voter Exit Poll Results 2021 Live Streaming: पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, असम, पुदुच्चेरी  विधानसभा निवडणूक एक्झिट पोल निकाल इथे पहा लाईव्ह
Exit Poll Results 2021 | Photo Credits: PTI

Exit Poll Results Of West Bengal, Assam, Tamil Nadu, Kerala & Puducherry Assembly Elections 2021: कोविड संकटकाळामध्येही देशात 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणूकीची धुमश्चक्री रंगली. आज या विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी थांबली आहे. आणि आता विधानसभा निकालांपूर्वी मतदारांसह देशातील जनतेला कोणत्या राज्यात कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता लागली आहे. पश्चिम बंगाल (West Bengal), तामिळनाडू (Tamil Nadu), केरळ (Kerala), असम(Assam) , पुदुच्चेरी (Puducherry) या राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीचे आज एक्झिट पोल निकाल (Exit Poll Results) समोर येणार आहेत. ABP News यांनी C-Voter च्या सोबतीने या पाचही राज्यांत झालेल्या मतदानानंतर मतदारांचा कल जाणून घेतला आहे. आणि तो आज संध्याकाळी 7 नंतर प्रसिद्ध केला जाणार आहे.

पश्चिम बंगाल मध्ये 8 विविध टप्प्यांत विधानसभा निवडणूका पार पडल्या आहेत. ममता दीदी विरूद्ध नरेंद्र मोदी अशी सभांमध्ये रणधुमाळी बघायला मिळाली. या दोन्ही दिग्गज राजकीय मंडळींनी यशाशक्ती कोविड संकटात सभा गाजवल्या आहेत त्यामुळे आता पश्चिम बंगाल मध्ये सत्ता राखण्यात टीएमसी यशस्वी होणार की भाजपा बाजी मारणार याची उत्सुकता वाढली आहे.

ABP C-Voter Exit Poll लाईव्ह कुठे पहाल?

ABP C-Voter Exit Poll निकाल तुम्हांला एबीपी न्यूज वर पाहता येणार आहे. पश्चिम बंगाल सोबतच तामिळनाडू, केरळ, असम, पुदुच्चेरी या राज्यांमधील राजकीय घडामोडी देखील या पोल मधून पहायला मिळणार आहेत. टेलिव्हिजन सोबतच एबीपी न्यूजच्या अ‍ॅपवर, ABP Live's app वर देखील हा एक्झिट पोल पाहता येणार आहे.

दरम्यान आज केवळ एक्झिट पोल निकाल जाहीर केले जाणार आहेत. 2 मे दिवशी 5 ही राज्यांमधील निकाल जाहीर केला जाणार आहे. देशातील सध्याची कोविड परिस्थिती पाहता यंदा खबरदारीच्या दृष्टीने विजयी मिरवणूकांवर बंदी घातली आहे तर मतमोजणीच्या ठिकाणी देखील उपस्थितांच्या संख्येवर मर्यादा घालत येणार्‍यांना आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटीव्ह असल्याचा दाखला द्यावा लागणार असल्याचंही बंधनकारक करण्यात आले आहे.