Arvind Kejriwal (Photo Credits: PTI)

लोकसभा निवडणूकीच्या (Loksabha Elections 2019) अखेरच्या टप्प्यापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi Chief Minister Arvind Kejriwal) यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. भाजप (BJP) पक्षाचे नाव न घेता केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींप्रमाणेच माझीही हत्या केली जाईल, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या या विधानावर दिल्ली पोलिसांनीही चोख उत्तर दिले आहे. दिल्ली पोलिसांनी न्युज एजेंसी एएनआयला दिलेल्या माहितीत सांगितले की, सीएम यांच्या सुरक्षा टीममध्ये तैनात असलेले सुरक्षारक्षक आपल्या कर्तव्यात निष्ठावान आहेत. ही तुकडी सर्व राजकिय दलातील उच्च पदस्थ लोकांना सुरक्षा प्रदान करते.

ANI ट्विट:

पंजाबमध्ये निवडणूकच्या प्रचारादरम्यान अरविंद केजरीवाल यांनी मीडियाशी बोलताना हे विधान केले. स्वतःवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्याबद्दल बोलताना केजरीवाल म्हणाले की, "कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यावर सातत्याने हल्ला होणे, हे गेल्या 70 वर्षात पहिल्यांदाच होत आहे. असे झाल्यास एक दिवस माझी हत्या करतील आणि केजरीवाल यांचा कोणी नाराज कार्यकर्त्याने हे कृत्य केले आहे, असे सांगतील. सुरक्षा ताब्यात नसलेला मी केवळ एकमेव मुख्यमंत्री आहे. जे मागे पुढे करतात ते देखील सर्व भाजप सरकारला रिपोर्ट करतात. माझा पीएसओ भाजपला रिपोर्ट करतो. इंदिरा गांधींप्रमाणे भाजप पक्ष पीएसओ द्वारे माझी हत्या करतील आणि माझे आयुष्य दोन मिनिटांत संपेल."