कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण देशात धुमाकूळ घातला आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मात्र, कोरोना विषाणूबाबत अद्यापही साकारत्मक बदल दिसून आला नाही. देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउन (Lockdown) घोषीत करण्यात आले होते. परंतु, खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाउन 31 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. यातच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 26 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता मन की बात (Mann Ki Baat) या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. एवढेच नव्हेतर या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेला आपले नोंदवण्याचे आवाहन केले आहे. आपले मत नोंदवण्याकरिता जनतेला 1800-11-7800 करुन दिला आहे. याव्यतिरिक्त नागरिक MyGov आणि NaMo ऍपद्वारे आपले मत नोंदवू शकतात.
कोरोना विषाणूने संपूर्ण देशाला हादरून टाकले आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिलपर्यंत लाकडॉउन घोषीत केला होता. परंतु, दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून काही राज्यात लॉकडाउन 31 एप्रिलपर्यंत वाढण्यात आला आहे. दरम्यान नरेंद्र मोदी 26 एप्रिलला जनतेशी मन की बात मधून संवांद साधणार आहेत. या कार्यक्रमात ते कोरोना विषाणूवर चर्चा करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. हा कार्यक्रम आणखी खास ठरू शकतो. कारण या कार्यक्रमात जनतेला आपले मत नोंदवता येणार आहे. हे देखील वाचा- Earthquake In Delhi: दिल्ली-एनसीआरमध्ये 3.5 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का
नरेंद्र मोदी यांचे ट्वीट-
This month’s #MannKiBaat will take place on the 26th.
What are you suggestions for this episode?
Dial 1800-11-7800 to record your message, write on MyGov or the NaMo App. https://t.co/Sk24d9Fhw1 pic.twitter.com/pdO9CXichp
— Narendra Modi (@narendramodi) April 12, 2020
भारतात आतापर्यंत एकूण 8 हजार 447 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 273 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 775 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 1895 वर पोहचली आहे. यात 127 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 208 रुग्ण कोरोना विषाणूच्या जाळ्यातून बाहेर आल्याचे समजत आहे.