Representational Image |(Photo Credits PTI)

Earthquake In Delhi: दिल्ली एनसीआरमध्ये (Delhi-NCR) आज सायंकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी 3.5 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा (Earthquake) धक्का जाणवला आहे. या भूकंपाचे मुख्य केंद्र दिल्लीतील NCT परिसरापासून 8 किलोमीटर अंतरावर होते. सुदैवाने या भूकंपामुळे कोणतेही नुकसान झालेले नाही. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजधानीत भुंकप झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. केजरीवाल यांनी आपल्या अधिकृत ट्विटमध्ये म्हटलं आहे की, दिल्लीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. आशा आहे की, प्रत्येकजण सुरक्षित आहे. मी तुमच्या प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो,' असंही केजरीवाल यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा - Coronavirus: भारतात गेल्या 24 तासात 918 कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने आकडा 8447 वर पोहचला तर 31 जणांचा मृत्यू)

सध्या संपूर्ण देशाला कोरोना व्हायरसने विळखा घातला आहे. यात दिल्लीतील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा मोठा आहे. अशातचं आता दिल्लीत आज भूकंपाचा धक्का जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.