Coronavirus | Photo Credits: Unsplash

भारतात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातल्याने दिवसागणिक त्याच्या रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. तसेच देशभरातील वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स दिवसरात्र कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत आहेत. तर काही राज्यात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता लॉकडाउन अधिक काही दिवस वाढवण्याच आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्याने सध्याची देशातील परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे या काळात घरात थांबणे हाच एक मार्ग आहे. तरीही काहीजण विनाकारण घराबाहेर पडत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत करत आहेत. त्यानुसार आता देशात गेल्या 24 तासात 918 कोरोनाची नवे प्रकरणे समोर आले आहेत. तर 31 जणांचा मृत्यू झाला आहे.(Coronavirus: जगभरातील 52 देशांतील 22 हजार वैद्यकीय कर्मचाऱ्यांना COVID-19 संसर्ग- जागतिक आरोग्य संघटना)

 केंद्रीय आरोग्यमंत्रालय दररोज देशातील कोरोनाच्या परिस्थिती बाबत आढावा घेत एकूण आकेडवारी जाहीर करतात. त्यानुसार आता नवे 918 रुग्ण आढळून आले आहेत. तर 31 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 8447 वर पोहचला आहे. त्यापैकी 7409 हे अॅक्टिव रुग्ण, 765 रुग्णांची प्रकृती सुधारुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर एकूण मृतांचा आकडा 273 वर पोहचल्याची माहिती देण्यात आली आहे.(Lockdown: अन्न, औषधं खरेदी करण्यासही नाहीत पैसे; 62.5% लोकांना सतावतेय आर्थिक तंगी)

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशातील सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यातील कोरोनाच्या परिस्थिती बाबत अधिक आढावा घेतला. तसेच पीपीई कीट आणि मास्क बनवण्यात भारत जगभरातील दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे.