रविवारी लुधियानामधील (Ludhiana) धांधारी पुलाखालील (Dhandhari bridge) झोपडपट्टीत मोठ्या आवाजात संगीत वाजवण्यावरून झालेल्या भांडणात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्याची गर्भवती पत्नी आणि कुटुंबातील तीन सदस्य जखमी झाले. दिनू मेहता असे पीडितेचे नाव असून तो मूळचा मध्य प्रदेशचा रहिवासी आहे. त्यांची पत्नी नगीना, सासरे लालू, मेव्हणा सेहदेव आणि सासू रायमून जखमी झाले. पोलिसांनी पाच आरोपी, मध्य प्रदेशातील मेहत लाल आणि गुन्ह्यानंतर पळून गेलेले त्याची चार मुले संजय, श्याम कुमार, शिपाही लाल आणि राजन यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. हेही वाचा IAF Agniveer Recruitment: वायुसेनेत अग्निवीर होण्यासाठी तरुणांनी दाखवला उत्साह, तीन दिवसांत अनेक तरुणांनी केले अर्ज
साहनेवाल पोलिस स्टेशनचे स्टेशन हाऊस ऑफिसर पवन कुमार यांनी सांगितले की मेहता यांच्या मेहुण्याच्या पत्नीने एका मुलीला जन्म दिला. ते संगीत वाजवून आनंद साजरा करत होते. तेव्हा लाल आणि त्यांचे मुलगे आले. त्यांना संगीत बंद करण्यास सांगितले. त्यानंतर वाद झाला आणि लाल आणि त्याच्या मुलांनी दिनू आणि त्याच्या कुटुंबीयांवर लाठ्या-विटांनी वार केले.मेहता यांच्या पश्चात चार मुले आणि गर्भवती पत्नी असा परिवार आहे. आरोपीविरुद्ध साहनेवाल पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.