Image Used for Representational Purpose Only (Photo Credits: ANI)

लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election) या देशातील सर्वात महत्वाच्या निवडणुका समजल्या जातात. या निवडणुकांसाठी जास्तीत जास्त मतदान व्हावे म्हणून निवडणूक आयोग, विविध पक्ष यांच्याकडून नेहमीच आवाहन करण्यात येते. यावेळी मतदानाच्या जनजागृतीसाठी ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन (AIPDA)ने पुढाकार घेतला आहे. जास्तीत जास्त मतदान व्हावे म्हणून त्यांनी एक ऑफर आणली आहे. लोकसभा निवडणुकीत मतदान करा आणि जवळच्या पेट्रोल-डिझेल पंपावर प्रतिलीटर 50 पैसे सूट मिळवा अशा ऑफरची घोषणा करण्यात आली आहे.

मतदान करुन आलेल्या मतदाराला पेट्रोल, डिझेल खरेदीवर प्रतिलीटर 50 पैशांची सूट मिळणार आहे. यासाठी आपल्या बोटावरील शाई जवळच्या पेट्रोल पंपावर दाखवावी लागणार आहे. ही ऑफर मतदानाच्या दिवशी सकाळी 8 वाजेपासून रात्री 8 वाजेपर्यंत असणार आहे. (हेही वाचा: पेट्रोल - डिझेलचा महाघोटाळा : पाईपलाईन फोडून चोरले लाखो रुपयांचे इंधन)

दरम्यान मतदानाचे प्रमाण वाढावे म्हणून विविध सामाजिक संस्था जनजागृती करत असतात. त्यात आता सामान्य नागरिकांचीही भर पडली आहे. भांडूपच्या एका फरसाण विक्रेत्याने मुंबईमध्ये 29 एप्रिलला मतदान करा आणि 30 एप्रिलला बेकरीमधील सर्व पदार्थ 50 टक्के सवलतीत मिळवा अशी ऑफर आणली आहे.