पेट्रोल - डिझेलचा महाघोटाळा : पाईपलाईन फोडून चोरले लाखो रुपयांचे इंधन
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

देशातील सर्वात मोठा पेट्रोल आणि डिझेल घोटाळा समोर आला आहे. शेजाऱ्याकडून चोरून वीज घेणे, पाईप फोडून पाणी चोरने असे प्रकार आपण पहिले असतील, मात्र हैदराबादमध्ये चक्क पेट्रोल-डिझेलची पाईपलाईन फोडून हजारो लिटर इंधन चोरी झाले असल्याची बाब निदर्शनास आली आहे. या पाईपमधून हे इंधन बाहेर काढून, त्याने टँकरच्या टँकर भरले गेले आहेत. या इंधनाची विक्री महाराष्ट्र आणि तेलंगाना येथील अनेक पेट्रोल पंपांवर बेकायदा चालू होती. रचकोंडा (Rachakonda) पोलिसांनी यावर कारवाई करत चार लोकांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांना यामध्ये एकूण 12 लोकांवर संशय आहे. मिळालेल्या माहितीनुसार. या गँगने इंडियन ऑयल कॉर्पोरेशन (IOC) आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (BPCL) डिझेलच्या 2 पाईपलाईन जिथून जात होत्या तिथे जमीन भाडेतत्वावर घेतली. त्यानंतर त्यांनी जमिनीमधून त्या पाईप लाईनपर्यंत भुयार खणले. त्यानंतर त्या पाईपला मोटार बसून एका नळाद्वारे त्यांनी ते इंधन काढायला सुरुवात केली. यामध्ये त्यांनी तब्बल बीपीसीएलकडून 84,365 किलोलिटर डिझेल आणि आयओसीकडून 46,236 किलो लिटर चोरी केले. या चोरी ककेलेल्या डीझेलचे एकूण 7 टँकर भरले होते. (हेही वाचा : आनंदाची बातमी ! आता पेट्रोल आणि डिझेलची होणार होम डिलिव्हरी; घरबसल्या करा ऑर्डर

यातील 2 टँकर हे तेलंगणा राज्यामध्ये विकले गेले. त्यानंतर पोलिसांनी छापा मारून 4 जणांना अटक केली. त्यांच्याकडून 90 लाख 40 हजार रोख जप्त करण्यात आले आहे. इतर 8 आरोप फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.