आधुनिक भारतातील सर्वात मोठी चूक म्हणजे फाळणी- जितेंद्र सिंह
jitendra Singh (PTI)

पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह (Jitendra Singh) यांनी एका कार्यक्रमात देशातील फाळणी संदर्भात एक विधान केले आहे. भारताकडून (India) खूप मोठी चूक झाली आहे. जर फाळणी झालीच नसती तर, आज जम्मू-काश्मीरसारखे (Jammu Kashmir) गंभीर मुद्दे उपस्थित झाले नसते. त्याचबरोबर देशातील फाळणीच्या निर्णयावर स्वत: महात्मा गांधी (Mahatma Gandhi) निराश होते, असेही ते कार्यक्रम दरम्यान म्हणाले आहेत.

नुकतीच शुक्रवारी विश्व हिंदी परिषदेचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी देशाच्या फाळणी बाबत त्यांचे मत मांडले आहे. त्यावेळी ते म्हणाले की, "आधुनिक भारतातील सर्वात मोठी चूक म्हणजे फाळणी. गांधीजी म्हणाले होते की, जर फाळणी झाली तर केवळ त्यांच्या शरिरावर होईल. यामुळे गांधीजी खूप दुखावले गेले आणि भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनी बंगालला (Bangal) रवाना झाले होते." त्यांनी या दरम्यान असेही म्हटले आहे की "काही लोकांच्या महत्त्वाकांक्षेमुळेच विभाजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने फाळणीला विरोध केला होता. जर फाळणी झालीच नसती तर, जम्मू काश्मीरवर वाद निर्माण झाले नसते. तसेच अनुच्छेद 370 (Artical 370) हटवण्याची गरज भासली नसती." हे देखील वाचा-लद्दाख सीमेवर भारत आणि चीन लष्कराच्या सौनिकांमध्ये धक्काबुक्की

मोदीं सरकारला १०० दिवल पूर्ण झालेच्या निमित्ताने जिंतेद्र सिंह बोलत होते. भाजपच्या सरकारने नेहमी चांगले निर्णय घेतले आहेत, असे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होते. जम्मू काश्मीरला विशेष राज्याचे दर्जा देण्यारे अनुच्छेद 370 रद्द करुन भाजपच्या सरकारने देशात समानता निर्माण केली आहे. लवकरच हे सरकार पीओके मध्ये भारतीय झेंडा रवेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.