Prime Minister Narendra Modi. (Photo Credits: Twitter)

'परीक्षा पे चर्चा 2020' या कार्यक्रमाचं आज (20 जानेवारी) दिल्लीमध्ये तालकाटोरा स्टेडियम (Talkatora Stadium) मध्ये करण्यात आलं आहे. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांना आगामी बोर्ड परीक्षांसाठी मार्गदर्शन करणार आहेत. बोर्डाची परीक्षा म्हटली की त्याचा बागलबुवा अधिक केला जातो. मुलांच्या आणि पालकांच्या मनात परीक्षेची भीती, टक्केवारीचं टेंशन असतं. या सार्‍यातून अनेकदा काही विद्यार्थी अगदीच टोकाचं पाऊल उचलतात. आता विद्यार्थींना तणावमुक्त वातावरणातून परीक्षांना सामोरं जाण्यासाठी तयार करण्यासाठी नरेंद्र मोदी परीक्षांपूर्वी खास विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधणार आहेत. आज दिल्लीत आयोजित कार्यक्रमामध्ये सुमारे 2000 विद्यार्थी सहभागी होणार आहे. मग तुम्हांला हा कार्यक्रम पहायचा असेल तर या लिंकवर लाईव्ह स्ट्रिमिंग उपलब्ध आहे.

Pariksha Pe Charcha 2020 लाईव्ह कसं पहाल?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं इंटरअ‍ॅक्टिव्ह सेशन लाईव्ह पाहण्यासाठी युट्युब चॅनवलवर खास सोय करण्यात आली आहे. MyGov India वर देखील तुम्ही हा कार्यक्रम लाईव्ह पाहू शकता दिल्लीमधील तालकाटोरा स्टेडियम मध्ये आयोजित कार्यक्रमाचं स्ट्रिमिंग टेलिव्हिजनवर दूरदर्शन वाहिनीद्वारा केलं जाणार आहे. MHRD’s च्या युट्युब चॅनलद्वारा त्याचं स्ट्रिमिंग होईल. CBSE Board च्या ऑफिशिअल साईटवर देखील युट्युब, फेसबूक आणि ट्विटरच्या लाईव्ह स्ट्रिमिंगद्वारा कार्यक्रम पाहण्याची सोय करून देण्यात आली आहे.

2018 साली दिल्लीमध्ये 'Pariksha Pe Charcha'या कार्यक्रमाचा पहिल्यांदा आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर यंदा सलग तिसर्‍या वर्षी नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. 'Pariksha Pe Charcha' या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना आपले प्रश्न पाठवण्याची संधी असते. काही निवडक प्रश्नांना नरेंद्र मोदी उत्तर देतात. परीक्षेशी निगडीत काही प्रश्न अअणि समस्यांवर नरेंद्र मोदी स्वतः तोडगा काढत विद्यार्थ्यांची, पालकांची आणि शिक्षकांची मदत करतात.