Uttar Pradesh Video

Uttar Pradesh Shocker: उत्तर प्रदेशातील  (Uttar Pradesh ) बांदा जिल्ह्यात एका दामप्त्यांकडून पंचायत सचिवाला मारहाणा (Beating Case) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना बांदा येथील नरैनी पंचायत इमारती बाहेर घडली आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, सरकारी ड्युटीवर असलेल्या पंचायत सचिवाला महिला आणि तिचा पती मारहाण करत आहे. त्यामुळ दोघांविरुध्दात तक्रार नोंदवला गेला आहे. (हेही वाचा- लातूरमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद, दोघा भावांवर जीवघेणा हल्ला, एकाचा दुदैवी मृत्यू,)

मिळालेल्या माहितीनुसार, बांदा येथील एक महिला आणि तिचा पती पंचायत कार्यलायच्या समोर पंचायच सचिवाला चप्पलेने मारहाण करत आहे. पीडिताला जमिनीवर पाडून त्याला ठोसे आणि लाथांनी मारत आहे. पगान न देण्यावरून महिला आणि तिच्या पतीने पीडितेला मारहाण केल्याच सांगितले जात आहे. रोहित कुमार असे पंचायत सचिवाचे नाव आहे. मारहाणप्रकराणी तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

ग्रामपंचायत इमारतीतील साफसफाईचे काम असलेल्या रेखा आणि त्यांचे पती गणेश वाल्मिक कार्यलयात पोहोचले आणि गेल्या चार महिन्यांपासून पगार न देण्यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. त्यांनी थकबाकी देण्याची मागणी केली, परंतु त्याने ऐकले नाही म्हणून गणेशने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर रेखाने देखील चप्पलेने मारलं. पीडित रोहित कुमार यांने असा आरोप केला की, कार्यलयात दोघांनी ही शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांनी आपल्याकडून अनावश्यक पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली आणि अंगावरचे कपडे देखील फाडले. बांदा पोलिस या प्रकरणी तक्रार करण्यात आली, पोलिसांनी पुढील कारवाई सुरु केली आहे.