Fawad Choudhary (Photo Credit: Twitter)

नुकताच दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल (Delhi Assembly Election2020) जाहीर झाला असून यंदाही अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी बाजी मारली आहे. दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अनेकांनी आपल्या नोंदवल्या आहेत. यातच पाकिस्तान मंत्री फवाद चौधरी (Fawad Chowdhury) यांनी ट्विट करत सर्वांच लक्ष केंद्रीत करुन घेतले आहे. फवाद चौधरी हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असतात. दिल्ली विधानसभा निवडणुकीत जनतेने आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या बाजूने कौल दिला आहे. तर, दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचा (BJP) मोठा पराभव मानला जात आहे. यावर फवाद चौधरी यांनी ट्विटरच्या माध्यमातून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा बिचारा असा उल्लेख करत आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकाल पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच देशाच्या राजधानीच्या विधानसभेची किल्ली आपल्या हातात घेण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या भाजपच्या हाती केवळ निराशा लागली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत जनतेने अरविंद केजरीवाल यांच्या हाती तिसऱ्यांदा सत्ता दिली आहे. दिल्लीत विधानसभेच्या 70 जागा आहेत. यांपैकी आम आदमी पक्षाला 62 तर, भारतीय जनता पक्षाला केवळ 8 जागेवर विजय मिळवता आला आहे. यावर पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी नरेंद्र मोदी यांच्या पराभवावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. Aww, ये क्या हुआ? असे मजकूर लिहून ट्विट केले आहे. तसेच या ट्विटमध्ये बिचारा मोदी म्हणून हॅशटॅग वापरला आहे. हे देखील वाचा- अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24 आणि 25 फेब्रुवारी ला भारत दौऱ्यावर; White House ची माहिती

फवाद चौधरी यांचे ट्वीट-

दिल्ली विधानसभान निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर फवाद यांनी अरविंद केजरीवाल यांनाच मत देऊन मोदींना पराभूत करा असे आवाहन केले होते. मात्र, त्यावेळी आप नेते अरविंद केजरीवाल यांनी आक्रमक भुमिका घेत फवाद यांना प्रत्यूत्तर दिले होते. नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत. तसेच माझेही पंतप्रधान आहेत. दिल्ली निवडणूक ही भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. तसेच दहशतवाद्यांना प्राधान्य देणाऱ्यांनी यात हस्तक्षेप करू नये, असेही केजरीवाल म्हणाले आहेत.