Leopard Attack In Gir: गुजरात (Gujarat) मधील गीर सोमनाथ जिल्ह्यात (Somnath District) झालेल्या एका दुर्दैवी अपघातात (Accident) एका व्यक्तीचा मृत्यू झाला. बिबट्याने अचानक दोन लोकांवर हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यात एका 44 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. तसेच आणखी एक जण गंभीर जखमी झाला. वन विभागाच्या अधिकाऱ्याने रविवारी या घटनेची माहिती दिली. घटनेनंतर, बिबट्या घटनास्थळावरून पळून गेला. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घराबाहेर झोपलेल्या लोकांवर हल्ला -
वन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, हे संपूर्ण प्रकरण गिर गधरा तालुक्यातील कोडिया गावाचे आहे. येथे शनिवारी रात्री उशिरा एका बिबट्याने शेताजवळ घराबाहेर झोपलेल्या लोकांवर हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याचे सहाय्यक वनसंरक्षक (एसीएफ) करण भाटिया यांनी सांगितले. या हल्ल्यात आणखी एक जण गंभीर जखमी झाला. (हेही वाचा -Pune Leopard Attack: शिरूर मध्ये 4 वर्षीय मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू)
बिबट्याने ओढून नेले -
घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या परिसरातील लोकही घटनास्थळी जमा झाले. गावकऱ्यांनी आरडाओरडा करताच बिबट्या तिथून पळून गेला. यानंतर, जखमीला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. सहाय्यक वनसंरक्षक (एसीएफ) करण भाटिया यांनी सांगितलं की, बिबट्याने प्रथम वाघाभाई वाघेलावर हल्ला केला. जेव्हा त्यांनी लोकांनी आवाज दिला तेव्हा बिबट्याने त्यांना काही अंतरापर्यंत ओढत नेत होते. या हल्ल्यात वाघेला यांचा मृत्यू झाला. यानंतर, आवाज ऐकून बिबट्या तेथून पळून गेला. (हेही वाचा- Leopard in Wagholi: पुण्यातील वाघोली परिसरात पुन्हा आढळला बिबट्या; रहिवाशांमध्ये सुरक्षिततेची चिंता वाढली (Watch Video) )
दरम्यान, काही वेळाने, बिबट्या परत आला आणि दुसऱ्या व्यक्तीवर हल्ला करून त्याला जखमी केले. वन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात 6 पिंजरे लावण्यात आले आहेत. याशिवाय, आजूबाजूच्या लोकांना जागरूक केले जात आहे. तसेच, लोकांना सावधगिरी बाळगून बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.