मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नव्या मंत्रीमंडळात जुनेच मंत्री शपथ घेणार
Arvind Kejriwal | (Photo Credits-Twitter)

आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत 16 फेब्रवुवारी सरकार स्थापन होणार आहे. विशेष म्हणजे केजरीवाल यांच्या नव्या मंत्रीमंडळात जुनेच मंत्री शपथ (Old Ministers Take Oath) घेणार आहेत. केजरीवाल यांच्या याअगोदरच्या मंत्रीमंडळात कोणताही बदल होणार नसल्येचं सांगण्यात येत आहे. केजरीवाल तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

दिल्लीतील रामलीला मैदानात (Ramleela Maidan) रविवारी हा शपथविधी सोहळा (Oath Ceremony) पार पडणार आहे. विशेष म्हणजे केजरीवाल यांनी या कार्यक्रमाला फक्त दिल्लीतील जनतेला निमंत्रण दिलं आहे. शपथविधी सोहळ्यात आम आदमी पक्षाच्या जुन्या मंत्रीमंडळातील नेते पुन्हा एकदा मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी या मंत्र्यांना कोणतेही खातेवाटप करण्यात येणार नाही. कारण, आम आदमी पार्टीच्या मंत्रीमंडळातील सर्व मंत्री यंदा पुन्हा एकदा निवडूण आले आहेत. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांपैकी आम आदमी पार्टीने 62 जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजप पक्षाला केवळ 8 जागांवर हार मानावी लागली आहे. (हेही वाचा - सर्वोच्च न्यायलयाचा राजकीय पक्षांना दणका; गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांची माहिती जाहीर करण्याचे आदेश)

दरम्यान, रविवारी होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यास किंवा राजकीय नेत्यास निमंत्रण देण्यात आलेले नाही. हा कार्यक्रम फक्त दिल्लीकरांसाठी असणार आहे, असं आम आदमी पार्टीचे नेते गोपाल राय यांनी सांगितलं आहे. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनिष सिसोदीया यांनी देखील दिल्लीकरांना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण दिलेले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून दिल्लीकरांना रामलीला मैदानावर शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.