दिल्लीत फटाक्यांऐवजी गोळीबार करुन साजरी केली दिवाळी-व्हिडिओ व्हायरल
दादर फूलमार्केट गोळीबार ( प्रतिनिधिक छायाचित्र ) Photo credits Pixabay

दिल्लीमध्ये दिवसेंदिवस प्रदूषणाच्या समस्येने तेथील नागरिकांना भेडसावून सोडले आहे. तसेच शासनाने फटाके वाजवण्यास योग्य ती वेळही नेमून दिली होती. त्यामुळे दिल्लीतील एका परिवाराने फटाके न वाजवता गोळीबार करत दिवाळी साजरी केली असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हारल होताना दिसून येत आहे.

या व्हिडिओत गोळीबार करणारा व्यक्तीची मनोज जैन ही ओळख पटली आहे. तसेच मनोज त्याच्या घरातील इतर सदस्यांना हवेत गोळीबार करण्यास सांगत आहे. एवढच नसून त्याची मुलेसुद्धा यामध्ये गोळीबार करत असताना दिसून येत आहे. या प्रकरणी मनोजने सरकारच्या नियमांना पायदळी तूडवून बिंधास्त गोळीबार करत आहे.

परंतु मनोज जवळ असलेल्या बंदुका आल्या कुठून हा प्रश्न पोलिसांना पडला आहे. तसेच पोलीस या प्रकरणी कसून चौकशी करत असल्याचे सांगितले जात आहे.