Nitin Gadkari On Car Safety: नितीन गडकरी यांची मोठी घोषणा! आता प्रत्येक वाहनात द्यावे लागणार 'हे' सेफ्टी फीचर; 1 ऑक्टोबरपासून लागू होणार नियम
Nitin Gadkari | (Photo Credits: Twitter)

Nitin Gadkari On Car Safety: कारने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षा आता पूर्वीपेक्षा चांगली होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. लवकरचं भारतात विकल्या जाणार्‍या सर्व नवीन कारमध्ये सहा एअरबॅग (Six Airbags) ला मानक सुरक्षा वैशिष्ट्य (Standard Safety Feature) बनवले जाईल. हा नवीन नियम 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होतील.

रिपोर्टनुसार, अतिरिक्त एअरबॅग्जमुळे (Additional Airbags) वाहनांची किंमत 50 हजारांपर्यंत वाढू शकते. सध्या, 6 एअरबॅग मॉडेल्स आणि प्रकारांची किंमत सुमारे 10 लाख रुपयांपासून सुरू होते. यासंदर्भात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, भारताने अधिक कठोर सुरक्षा मानकांचा अवलंब करण्याची वेळ आली आहे. यापूर्वी जानेवारीमध्ये मंत्रालयाने आठ प्रवासी गाड्यांमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य करण्याच्या मसुद्याच्या अधिसूचनेला मंजुरी दिली होती. (हेही वाचा - Essential Medicines Price Hike: पेट्रोल-डिझेलनंतर आता औषधही महागले; Paracetamol सह 800 अत्यावश्यक औषधांच्या किमती एप्रिलपासून 10.7 टक्क्यांनी वाढणार)

मंत्रालयाने जानेवारी 2022 मध्ये एक मसुदा अधिसूचना जारी केली, ज्यामध्ये नवीन नियमांची रूपरेषा आखली गेली ज्यामुळे सर्व कारसाठी मानक म्हणून सहा एअरबॅग अनिवार्य होतील. अधिसूचनेनुसार, हा नियम 1 ऑक्टोबर 2022 पासून सर्व नवीन कारसाठी लागू होईल.

दरम्यान, 1 एप्रिल 2019 पासून भारतातील सर्व वाहनांसाठी ड्रायव्हर एअरबॅग्ज अनिवार्य करण्यात आल्या आहेत. त्यानंतर ड्युअल एअरबॅग्ज अनिवार्य करण्यात आल्या. सरकारने सर्व कारसाठी मानक सुरक्षा वैशिष्ट्ये म्हणून ड्युअल एअरबॅग्ज तसेच मागील पार्किंग सेन्सर आणि अँटी-लॉक ब्रेक अनिवार्य केलेले आहेत.