 
                                                                 Delhi Gang Rape Case: दिल्ली-एनसीआरमध्ये पुन्हा एकदा निर्भया प्रकरणासारखी (Nirbhaya case) घटना घडली आहे. मालमत्तेच्या वादातून दिल्लीतील एका महिलेचे अपहरण करून गाझियाबादमध्ये दोन दिवस तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. आरोपीने अमानुषतेची हद्द ओलांडत पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लोखंडी रॉडही घातला. महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
गाझियाबादच्या नंदग्राम पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. पाच आरोपींनी तिला दोन दिवस आपल्या वासनेची शिकार बनवले. आरोपींनी महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लोखंडी रॉडही घातला. यानंतर आरोपी पीडितेला लंगडलेल्या अवस्थेत आश्रम रोडजवळ फेकून फरार झाले. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी पीडितेला रुग्णालयात दाखल केले. पीडितेवर दिल्लीच्या जीटीबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (हेही वाचा - Crime: कुत्र्याने घराबाहेर शौच केल्याने झाला वाद, रागातून महिलेची तरुणाला मारहाण)
गाझियाबादचे एसपी निपुण अग्रवाल यांनी सांगितले की, ही महिला दिल्लीतील नंदनगरीची रहिवासी आहे. ती नंदग्राम परिसरात भावाच्या घरी आली होती. परतत असताना काही लोकांनी तिला उचलले. चौकशीत आरोपींची या महिलेशी पूर्वीपासून ओळख असून मालमत्तेवरून दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू असल्याचे समोर आले. याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी गाझियाबाद पोलिसांना नोटीस बजावली आहे.
एसपी निपुण अग्रवाल यांनी सांगितलं की, 18 ऑक्टोबरला नंदग्राम पोलिसांना आश्रम रोडवर महिला सापडल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी तिला रुग्णालयात नेले. ती दिल्लीची रहिवासी असून भावासोबत नंदग्रामला आली होती. तिचा भाऊ तिला सोडायला आला होता. यानंतर तिचे अपहरण करून हा गुन्हा करण्यात आला. या घटनेसंदर्भात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
