Remdesivir (Photo Credits: ANI)

भारतामध्ये पुन्हा कोविड 19 रूग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याने स्थिती चिंताजनक बनत आहे. त्यामुळे कोरोना वायरसला रोखण्यासाठी आता लॉकडाऊन ऐवजी इतर यंत्रणा वाढवून सामना करण्याचा निर्णय झालेला दिसत आहे. भारतातील ड्र्ग्स फर्म Zydus Cadila यांनी या कोविड 19 विरूद्धच्या लढ्यात वापरली जाणारी antiviral drug Remdesivir (Remdac) यांच्या किंमतीमध्ये घट केली आहे. पूर्वी 2800 रूपयांना मिळणारं रेमडीसीवर आता 899 रूपयांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. भारतात मागील वर्षी कोविड 19च्या उपचारांमध्ये रेमडीसीवीर वापरले जात होते.

भारतामध्ये दिवसागणिक वाढणारी रूग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि सार्‍या स्तरातील रूग्णांला रेमडीसीवीर मिळावं यासाठी या माफक दरात ड्रग्स उपलब्ध करण्यात आली आहे. असे सांगण्यात आले आहे.

Cadila Healthcare Limited च्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. शार्विल पटेल यांच्या माहितीनुसार, 'Remdac हे औषध कोविड 19 सारख्या आजारात लढण्यासाठी प्रत्येक रूग्णाला माफक दरात आता उपलब्ध केली जाणार आहे.' अनेकदा या औषधाचा खोटा तुडवडा निर्माण केला जात असल्याचंदेखील पहायला मिळालं होतं.

भारतामध्ये Hetero Labs Ltd, Cipla, Mylan NV आणि Jubilant Life Sciences Ltd नंतर झायडस ही पाचवी कंपनी आहे ज्यांच्याकडून रेमडीसीवर औषधांची निर्मिती केली आहे. अमेरिकेमध्येही कोविड 19 च्या गंभीर रूग्णांना ट्रीट करण्यासाठी Remdesivir वापरण्याला US FDA ने तातडीची मंजुरी दिली आहे.

भारतामध्ये डबल म्युटंट कोरोना वायरस आढळल्याचं काल स्पष्ट करण्यात आले आहे. हा विषाणूचा प्रकार आता भारतामध्ये धुमाकूळ घालत असल्याने स्थिती चिंताजनक बनली आहे. दरम्यान वाढत्या कोरोना रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आता भारतातून निर्यात केली जाणारी कोविड 19 लस  देखील थांबवण्याचा निर्णय झाला आहे.