ZyCOV-D Vaccine डेल्टा वेरिएंटवर प्रभावशाली; 56 दिवसांत घ्यावे लागणार 3 डोसेस
ZyCOV-D Vaccine (Photo Credits: Wikipedia)

भारतात विकसित करण्यात आलेली डीएनए वर आधारित झायडस कॅडिला (Zydus Cadila) च्या झायको-डी (ZyCOV-D) कोविड-19 लसीला (Covid19 Vaccine) कालच आपात्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. ही लस कोविड-19 च्या डेल्टा वेरिएंट (Delta Variant) वर परिणामकारक असून सुमारे 66 टक्के प्रभावी आहे. मात्र या लसीचे तीन डोस घ्यावे लागतात. पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनंतर दुसरा डोस आणि पहिल्या डोसच्या 56 व्या दिवशी तिसरा डोस दिला जातो.

झायडस ग्रुपचे एमडी डॉ. शरविल पटेल यांनी सांगितले की, झायकोव-डी लसीच्या ट्रायल्स मध्ये 28,000 स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता. दोन्ही ट्रायल्सचे निष्कर्ष सायंटिफिक रिसर्च आणि स्कुटनी च्या लैंसेट मध्ये पब्लिश करण्यात आला आहे. तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल्सच्या निकालासाठी अजून 2-3 महिने प्रतिक्षा करावी लागेल. (COVID-19 Vaccine Update: झायडस कॅडिला च्या ZyCoV-D कोविड-19 लसीला आपत्कालीन वापरासाठी केंद्राची मंजुरी)

ही लस 66 टक्क्यांपेक्षा अधिक प्रभावी असून डेल्टा वेरिएंटवर सुमारे 66 टक्के इतकी परिणामकारक आहे. या लसीची किंमत पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येईल. त्यांनी सांगितले. सप्टेंबरच्या मध्यापर्यंत या लसीची पुरवठा सुरु होईल. तर ऑक्टोबर पासून या लसीचे उत्पादन वाढून 1 कोटी प्रती महिना केले जाईल.

ANI Tweet:

ZyCOV-D ही जगातील पहिली डीएनए आधारित लस असून हा भारताच्या शास्त्रज्ञांच्या उत्साहाचा पुरावा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते.

झायकोव्ह-डी लसीला आपत्कालीन वापरासाठी भारतीय औषध नियंत्रक जनरल (DCGI) ची मान्यता (EUA) मिळाली आहे. ही जगातील पहिली आणि भारतातील स्वदेशी विकसित डीएनए आधारित कोविड -19 लस आहे. तसंच ही लस प्रौढांसोबत 12 वर्षांवरील मुलांवर देखील वापरता येईल.