Yes Bank Layoffs: 'येस बॅंक' मधून 'Cost-Cutting' च्या  कारणाखाली 500 जणांना नारळ
Yes Bank | X

भारतामधील आघाडीच्या खाजगी बॅंकांपैकी एक Yes Bank,मध्ये नोकर कपात होणार आहे. 500 जणांना कॉस्ट कस्टिंग ची कारण सांगत कामावरून काढण्यात आलं आहे. रिपोर्ट्स नुसार येत्या काही आठवड्यांनंतर येस बॅंकेच्या कर्मचार्‍यांना कामावरून काढलं जाईल. बॅंकेच्या ऑपरेशन्स आणि एफिशियंसी मध्ये सुधारणा करण्यासाठी ही पावलं उचलली जात आहेत. Economic Times,च्या रिपोर्ट प्रमाणे Yes Bank आता 500 जणांना कामावरून काढून बॅंका खर्च कमी करून त्यांच्या संसाधनांचा योग्य ठिकाणी वापर केला जाणार आहे. ले ऑफ मुळे बॅंकेच्या विविध डिपार्टमेंटसवर परिणाम होणार आहे.

Yes Bank कडून मल्टिनॅशनल कंसल्टिंग फर्म कडून मिळालेल्या सल्लानुसार, अंतर्गत रिस्ट्रकचरिंग प्रोसेस होणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही नोकर कपात झाली आहे. ही कपात होलसेल, रिटेल आणि ब्रांच बॅंकिंग मध्ये होणार आहे. या माध्यमातून operational efficiency वाढवली जाणार आहे. बॅंकेकडून ग्राहकांना चांगल्या सोयी सुविधा दिल्या जातील हे लक्ष्य आहे. नक्की वाचा: Paytm Layoffs: पेटीएममध्ये पुन्हा एकदा नोकर कपातीची शक्यता; 5,000 ते 6,300 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले जाऊ शकते .

येस बँक सध्या खर्च कमी करण्याच्या प्रयत्नात अधिक डिजिटल बँकिंग ऑपरेशन्सकडे वळण्याचा विचार करत आहे. यामध्ये मॅन्युअल प्रक्रिया आणि मानवी हस्तक्षेप कमी होणे अपेक्षित आहे. याव्यतिरिक्त, बँक एक पुनर्रचना उपक्रम हाती घेत आहे, ज्यामुळे खर्च कमी करण्यात मदत होईल अशी अपेक्षा आहे.