
Yes Bank Receives Demand Notice: प्राप्तिकर विभागाने येस बँकेला (Yes Bank) 2,209.17 कोटी रुपयांची कर मागणी नोटीस (Tax Demand Notice) बजावली आहे. यामध्ये व्याजाचाही समावेश आहे. ही माहिती एका खाजगी बँकेने दिली. येस बँकेने स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, बँकेला सुरुवातीला 30 सप्टेंबर 2021 रोजी आयकर विभागाकडून 2019-20 या कर निर्धारण वर्षासाठी र सूचना मिळाली होती. पूर्वी दाखल केलेल्या आयकर रिटर्ननुसार परतावा मिळाल्यानंतर त्यांना ही नोटीस देण्यात आली. तथापि, एप्रिल 2023 मध्ये आयकर विभागाने हा खटला पुन्हा उघडला. 28 मार्च रोजी आयकर विभागाच्या राष्ट्रीय फेसलेस असेसमेंट युनिटने पुनर्मूल्यांकन आदेश पारित केला.
बँकेने दाखल केलेल्या अर्जात पुढे म्हटले आहे की, मूळ मूल्यांकन आदेशात निश्चित केलेले एकूण उत्पन्न अपरिवर्तित राहिले पाहिजे होते आणि म्हणूनच, बँकेविरुद्ध कोणतीही कर मागणी केली जाऊ नये. तथापी, येस बँकेचा असा विश्वास आहे की या प्रकरणात त्यांची भूमिका सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे आधार आहेत. बँकेने स्पष्ट केले की त्यांच्या कामकाजावर कोणताही प्रतिकूल परिणाम होण्याची अपेक्षा नाही. (हेही वाचा - YES Bank Crisis: येस बॅंकेच्या ग्राहकांना आणखी एक धक्का; डिजिटल व्यवहार, एटीएम सेवा पूर्णपणे खंडीत झाल्याने खातेदारांची चिंता वाढली)
येस बँकेने दाखल केलेल्या अर्जात पुढे म्हटले आहे की, बँक लागू कायद्यानुसार या पुनर्मूल्यांकन आदेशाविरुद्ध अपील करेल. शुक्रवारी येस बँकेचे शेअर्स 16.88 रुपयांवर बंद झाले. गेल्या एका वर्षात येस बँकेचे शेअर्स 27.24 टक्क्यांनी घसरले आहेत. आर्थिक वर्ष 25 च्या तिसऱ्या तिमाहीत येस बँकेचा नफा तीन पटीने वाढून 612 कोटी रुपये झाला आहे. (हे देखील वाचा- PMC Bank Crises: ईडीकडून HDILचे संचालक सारंग आणि राकेश वाधवान यांच्या खाजगी वाहनांवर जप्ती)
गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत बँकेला 231 कोटी रुपयांचा नफा झाला होता. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत बँकेचे व्याज उत्पन्न वाढून 7,829 कोटी रुपये झाले, जे गेल्या वर्षी याच कालावधीत 6,984 कोटी रुपये होते. पुनरावलोकन कालावधीत बँकेचे एकूण उत्पन्न 8,179 कोटी रुपयांवरून 9,341 कोटी रुपयांवर पोहोचले.