Sarangs Car seized (Photo Credit: Twitter)

पंजाब महाराष्ट्र कॉपरेटिव्ह बँक (PMC) घोटाळा प्रकरणी एचडीआयएलचे (HDIL)संचालक सारंग (sarang Wadhawan) आणि राकेश वाधवान (Rakesh Wadhawan) यांना आर्थिक गुन्हे शाखेने (Economic Crime Branch) गुरुवारी अटक केली होती. या प्रकरणी ईडीने (ED) सारंग आणि राकेश वाधवान यांचे खाजगी जेट (Private Jet)आणि वाहनांवर (Cars) जप्ती (seized) केली आहे. सारंग आणि राकेश वाधवान यांनी 6500 कोट्यावधींचा घोटाळा केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. पीएमसी  बॅंक घोटाळ्यात हळूहळू मोठी नावे समोर येऊ लागली आहे. तसेच याप्रकरणात आत्तापर्यंत 5 जणांना अटक केली असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.

पीएमसीकडून एचडीआयएलला कर्ज देण्यात आले होते, मात्र एचडीआयएलने कर्जाची रक्कम वेळेत न भरल्याने पीएमसी बँक आणि बँकेतील खातेदार आता अडचणीत आले आहेत. बँकेला 4355.43 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याबद्दल हा एफआयआर नोंदविण्यात आला आहे. अहवालानुसार, पीएमसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक (आता निलंबित) जॉय थॉमस, अध्यक्ष वरम सिंग आणि अन्य अधिकाऱ्यांची नावे एफआयआरमध्ये होती. त्यामधील सारंग आणि राकेश यांना गुरुवारी अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आज सोमवारी ईडीने सारंग आणि राकेश वधवान यांच्या खाजगी वाहनांवर जप्ती केली आहे. हे देखील वाचा- PMC बँक खातेधारकांना आता 10 हजार ऐवजी 25 हजार रुपये काढता येणार, RBI कडून निर्णय जाहीर

एएमआयचे ट्विट-

तसेच पीएमसीच्या घोटाळ्यानंतर आरबीआयने या बँकेवर पुढील 6 महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले आहेत. त्यानुसार, बॅंकांना आता कर्ज देणे ठेवी स्वीकारणे यासह मोठ्या आर्थिक व्यवाहारांवर निर्बंध आले आहेत. तसेच आरबीआयने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार, आता खातेदार 25 हजार एकाच दिवशी किंवा सहा महिन्यांसाठी रूपयांची रक्कम काढू शकणार आहेत.