भारतातील COVID Vaccination चे वर्ल्ड बँकेकडून कौतुक 
Vaccination (Photo Credits-Twitter)

वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष डेविड मालपास यांनी कोविड19 च्या विरोधात लढण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या यशस्वी लसीकरणासाठी भारताचे कौतुक केले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या सोबत झालेल्या भेटीत त्यांनी लसीचे उत्पादनासह वितरणावरसंदर्भातील भारताच्या भुमिकेसाठी आभार मानले आहेत. सीतारमण यांच्या सोबतच्या बैठकीत मालपास यांनी वॉशिंग्टन स्थित आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्थेची आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ आणि बहुपक्षीय गुंतवणूक हमी एजन्सीसह जागतिक बँक समूहाच्या सर्व घटकांसाठी भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. वर्ल्ड बँकेने एक विधान जाहीर करत म्हटले की, त्यांनी हवामान बदलाबाबत भारताच्या प्रयत्नांवरही चर्चा झाली.

या व्यतिरिक्त डेविड यांनी म्हटले की, इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशनने भारताच्या सक्रिय योगदानाचे सुद्धा कौतुक केले. त्यांनी अशी अपेक्षा केली आहे की, भारत यापुढे सुद्धा आपली निर्णायक भुमिका कायम ठेवेल. बातचीत दरम्यान भारतीय अर्थव्यवस्थेवर ही चर्चा झाली. वर्ल्ड बँकेच्या अध्यक्षांनी भारताने काळानुसार महत्वपूर्ण बदल केल्याच्या गोष्टीवर ही आनंद व्यक्त केला. तर वर्ल्ड बँकेकडून सर्व प्रकारची मदत केली जाईल असे ही त्यांनी म्हटले.(Covid-19 Vaccine: कोविड-19 लसीचा बुस्टर डोस घेणे आवश्यक आहे का? पहा, काय म्हणाले नीती आयोगाचे सदस्य Dr. V. K. Paul)

Tweet:

Finance Minister Smt. @nsitharaman met World Bank Group President Mr @DavidMalpassWBG at @WorldBank HQ in Washington D.C., today (1/6) pic.twitter.com/GyjIbBzMZr

भारतातील लसीकरणाबद्दल बोलायचे झाल्यास आतापर्यंत एकूण 97.23 कोटी लोकांना लसीचा पहिला डोस दिला गेला आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, देशात 70 टक्के लोकांना पहिला डोस घेतला आहे. तर 30 टक्के लोकांना दोन्ही डोस दिले गेले आहेत. एका बाजूला लसीकरणाचा वेग वाढलेला दिसून येत आहे. तर दुसऱ्या बाजूला कोरोनाच्या रुग्णांचा आकडा ही कमी होत आहे. गेल्या 24 तासात भारतात 15,981 रुग्ण आढळून आले असून 200 हून कमी मृत्यू झाले आहेत.